'सेटवर फोन उचलल्याने दिग्दर्शकाने डोक्यावर मारलं'; अभिनेत्रीचा धक्कादायक अनुभव

'अनेक कलाकार अशा घटना मोकळेपणाने सांगण्यास घाबरतात, पण..'
Mrunalini Jambhale
Mrunalini Jambhale Instagram
Updated on

टीव्ही शोच्या सेटवर मानसिक छळ आणि त्रास सहन करण्याच्या अनेक घटना गेल्या काही वर्षांपासून वाढत आहेत. अनेक अभिनेत्री याआधीही अशा त्रासाला बळी पडल्या आहेत आणि आता त्या त्याबद्दल उघडपणे बोलत आहेत. टीव्ही अभिनेत्री मृणालिनी जांभळे (Mrunalini Jambhale) हिने काही वर्षांपूर्वी तिच्यासोबत घडलेल्या धक्कादायक घटनेविषयी खुलासा केला आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तिने शोच्या दिग्दर्शकाकडून तिचा कसा छळ केला गेला आणि टीव्ही शो निर्माते अजूनही नवोदितांचा फायदा घेतात असं तिला का वाटतं, याविषयी सांगितलं.

एका टीव्ही शोच्या सेटवरील अनुभव सांगताना मृणालिनी 'ई टाइम्स'ला दिलेल्या मुलाखतीत म्हणाली, "काही वर्षांपूर्वी मी एका टीव्ही शोचा एक भाग होते. त्या आठवणी किंवा प्रसंग आता आठवावेसे वाटत नाही, पण अन्नपूर्णा ताई आणि स्वाती भादवेसारख्या अभिनेत्रींनी आपल्या बाजू मांडल्या आहेत आणि याबद्दल मोकळेपणाने बोलले आहेत, तर मग मी का नाही? काही वर्षांपूर्वी माझ्यासोबत या धक्कादायक घटना घडल्या असल्या तरी याचा अर्थ मी त्यांना विसरले असं नाही. जेव्हा जेव्हा एखाद्या अभिनेत्रीला अशा त्रासाला सामोरं जावं लागतं तेव्हा माझ्यासोबत घडलेल्या सर्व गोष्टी मला अजूनही आठवतात."

एका प्रसंगाविषयी सांगताना मृणालिनी पुढे म्हणाली, "मी एक टीव्ही शो करत होते आणि दिग्दर्शक मला सेटवर नेहमीच छळत असत. तो आधी सहाय्यक होता पण नंतर तो दिग्दर्शक म्हणून काम करू लागला. तो माझ्या केसांविषयी, माझ्या भाषेविषयी टिप्पणी करायचा. इंग्रजीत काही संवाद होते, आणि मला इंग्रजी नीट येत नसल्याने तो सेटवर माझी बदनामी करू लागला. मला इंग्रजी अस्खलित बोलता येत नाही हे सांगितल्यावरही तो माझा अनादर आणि अपमान करत होता."

Mrunalini Jambhale
'आई कुठे काय करते'चा TRP घसरला; 'ही' मालिका ठरली नंबर १

"आम्ही एका दृश्यासाठी शूटिंग करत होतो आणि त्यासाठीची तयारी सुरू होती. सहसा, मी शूटिंगच्यादरम्यान कधीही फोन उचलत नाही. पण त्यादिवशी मला कॉलला उत्तर द्यावंसं वाटलं. फोन उचलताच त्याने ओरडून फोन खाली ठेवण्यास सांगितलं. नंतर तो माझ्याजवळ आला आणि त्याने माझ्या डोक्यावर मारलं. काही ज्येष्ठ कलाकारांशिवाय कोणीही तेव्हा हस्तक्षेप केला नाही. माझ्यावर हात उचलल्यानंतर आमचं भांडण झालं. मी खूप चांगली अभिनेत्री आहे असं म्हणत नाही, पण प्रत्येक अभिनेत्याला सन्मानाने वागवलं पाहिजे असं मला वाटतं", अशा शब्दांत तिने दु:ख व्यक्त केलं.

मृणालिनीने नंतर त्या दिग्दर्शकाविरोधात तक्रार दाखल केली. "मी अन्नपूर्णा ताईंसारखी नाही, ज्यांनी दिग्दर्शकांच्या अशा वागणुकीचा सामना करून शो मध्येच सोडला होता. त्यावेळी मी शोच्या संचालकाविरुद्ध पोलिस आणि महिला आयोगाकडे तक्रार केली होती. शोच्या निर्मात्यांनी नंतर त्याला हाकलून दिलं आणि मी अजूनही तिथेच काम करत होते. कारण माझ्यानंतर अनेकजणी पुढे येऊन त्याच्या वागणुकीविरोधात बोलल्या होत्या. अशा घटना थांबल्या पाहिजेत. नवोदित कलाकार अशा घटना मोकळेपणाने सांगण्यास घाबरतात. पण त्यांनी समोर येऊन व्यक्त होणं गरजेचं आहे", असं ती म्हणाली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com