Nagraj Manjule: 'नाळ'च्या प्रचंड यशानंतर येतोय 'नाळ २' नागराज मंजुळेची पोस्ट | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

director nagraj manjule shared post 'naal 2' marathi movie coming soon

Nagraj Manjule: 'नाळ'च्या प्रचंड यशानंतर येतोय 'नाळ २' नागराज मंजुळेची पोस्ट

Nagraj Manjule: फॅन्ड्री, सैराट, नाळ, झुंड आदी दर्जेदार चित्रपटांच्या माध्यमातून समाजातील वंचितांचे प्रश्न समोर आणणारे त्यावर सडेतोडपणे भाष्य करणारे एक संवेदनशील दिग्दर्शक म्हणजे नागराज पोपटराव मंजुळे. नागराज यांनी चित्रपट विश्वात स्वतःचे नावच केले नाही तर एक इतिहास घडवला. अत्यंत बिकट परिस्थितीवर मात करून नागराज इथवर पोहोचले आहेत. काही दिवसांपूर्वीच त्यांचा 'झुंड' चित्रपट येऊन गेला. त्याला प्रेक्षकांनी प्रचंड प्रतिसाद दिला. आता नागराज यांनी एक पोस्ट शेअर करत त्यांच्या नव्या चित्रपटाची घोषणा केली आहे. (director nagraj manjule shared post 'naal 2' marathi movie coming soon)

नगराज मंजुळे यांचे दिग्दर्शन तर आपण अनेक चित्रपटांमधून पाहिले आहेच. पण त्यांच्या अभिनयाची झलक दिसली ते 'नाळ' या चित्रपटातून. अनेक पुरस्कार प्राप्त आणि प्रचंड यश मिळवलेल्या चित्रपट म्हणजे 'नाळ'. या चित्रपट नागराज मंजुळे आणि देविका दफ्तरदार प्रमुख भूमिकेत होते. तर नागराज यांनी या चित्रपटाची निर्मितीही केली होती. या चित्रपटातून अत्यंत वेगळा विषय हाताळला गेला. आता याच चित्रपटाचा दुसरा भाग लवकरच आपल्या भेटीला येत आहे. नुकतीच याबाबत नागराज मंजुळे यांनी घोषणा केली.

नागराज यांनी एक पोस्ट शेअर केली आहे. त्यामध्ये म्हणतात, 'मागच्या महिन्यात सुधाकरने Sudhakar Yakkanti अचानक फोन करून सांगितलं की नाळचा दुसरा भाग लिहिलाय. ऐकायला कधी भेटुयात ?.. नाळ चा दुसरा भाग काय होऊ शकतो याबाबत माझ्याही मनात उत्सुकता तयार झाली. स्क्रिप्ट ऐकली ती इतकी अनपेक्षित तरीही सहज नि भारी होती की दोन महिन्यांच्या जय्यत तयारीनिशी फिल्मचं शूटिंग झटक्यात सुरू केलं. पहिल्या "नाळ" प्रमाणेच 'नाळ' चा दुसरा भागही संस्मरणीय होईल अशी आशा आहे ! "नाळ 2" नावानं चांगभलं !!!' असे नागराज यांनी म्हंटले आहे.