'विश्वास नाही बसत..'; दिग्दर्शक राजेश पिंजाणींच्या निधनावर नम्रताची भावूक पोस्ट

राजेश पिंजाणींच्या निधनामुळे मराठी चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे.
Rajesh Pinjani, Namrata Sambherao
Rajesh Pinjani, Namrata Sambherao

राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक राजेश पिंजाणी (Rajesh Pinjani) यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं. 'बाबू बँड बाजा' (Babu Band Bajaa) या चित्रपटासाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. पिंजाणी हे मूळचे नागपूरचे होते. कामानिमित्त ते पुण्याला मुक्कामाला होते. त्यांच्या निधनामुळे मराठी चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे. अनेकांनी सोशल मीडियावर पोस्ट लिहित शोक व्यक्त केला. 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम नम्रता संभेरावनंही (Namrata Sambherao) सोशल मीडियावर पोस्ट लिहित भावना व्यक्त केल्या.

'विश्वास नाही बसत सर, तुम्ही मला आपल्या नॅशनल अवॉर्ड विनिंग बाबू बँड बाजा फिल्ममध्ये महत्वाची भूमिका दिलीत. तुमचा हसरा चेहरा कायम लक्षात राहील, खूप काम करायचं होतं एकत्र, आपली भेट पण राहिली. तुमच्या आत्म्यास शांती लाभो,' अशी पोस्ट नम्रताने लिहिली आहे. राजेश यांनी 'बाबू बँड बाजा' हा चित्रपट दिग्दर्शित केला. मात्र तो अनेक महोत्सवांमध्ये गाजला. सामान्य माणसाच्या जगण्यातलं दु:ख यामध्ये मांडण्यात आलं होतं. अभिनेत्री मिताली जगताप, मिलिंद शिंदे आणि विवेक चाबुकेश्वर यांच्या चित्रपटात मुख्य भूमिका आहेत. तर नम्रताने यामध्ये महत्त्वपूर्ण भूमिका साकारली होती.

Rajesh Pinjani, Namrata Sambherao
'घाईघाईने RIP लिहिण्याच्या या जगात..'; सिंधुताईंच्या निधनानंतर तेजस्विनीची विनंती

'बाबू बँड बाजा' या चित्रपटासाठी राजेश पिंजाणी यांना तत्कालीन राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आला होता. अभिनेते जयवंत वाडकर यांनीसुद्धा सोशल मीडियावर पोस्ट लिहित दु:ख व्यक्त केलं.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com