सचिन कुंडलकर करणार 'नेटफ्लिक्स'साठी चित्रपट

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 10 नोव्हेंबर 2018

सचिन कुंडलकर यांनी स्वतः याबाबतची माहिती फेसबुकवर प्रसिद्ध केली आहे. सिंगापूर येथे झालेल्या कार्यक्रमात नेटफ्लिक्सकडून भारतीय कथांवरील चित्रपटांची घोषणा करण्यात आली. 'कोबाल्ट ब्लू' या कादंबरीवर मी माझ्या सहलेखकांसोबत हिंदी चित्रपटाची पटकथा लिहित आहे, असे त्यांनी सांगितले.

मुंबई : नेटफ्लिक्स या अमेरिकन स्टुडिओकडून येत्या वर्षभरात भारतीय कथांवरील चित्रपटांची घोषणा करण्यात आली. यामध्ये प्रसिद्ध दिग्दर्शक सचिन कुंडलकर यांच्या 'कोबाल्ट ब्लू' या कादंबरीवर आधारित चित्रपटाची निर्मिती करण्यात येणार आहे.

सचिन कुंडलकर यांनी स्वतः याबाबतची माहिती फेसबुकवर प्रसिद्ध केली आहे. सिंगापूर येथे झालेल्या कार्यक्रमात नेटफ्लिक्सकडून भारतीय कथांवरील चित्रपटांची घोषणा करण्यात आली. 'कोबाल्ट ब्लू' या कादंबरीवर मी माझ्या सहलेखकांसोबत हिंदी चित्रपटाची पटकथा लिहित आहे, असे त्यांनी सांगितले. या चित्रपटाची निर्मिती पुढील वर्षी होणार असून, दिग्दर्शक सचिन कुंडलकर करणार आहेत. 

कुंडलकर यांनी फेसबुकवर लिहिले आहे, की सुमित्रा भावे आणि श्री पु भागवत तसेच मौज प्रकाशनाच्या सर्व जाणत्या मंडळींचे आभार. सुमित्रा भावे, विजय तेंडुलकर, श्री पु भागवत आणि चेतन दातार या सर्वांचा कादंबरीवर मनापासून विश्वास होता. तेवीस-चोवीस वर्षांचा असताना मी हि कादंबरी लिहिली होती. नेटफ्लिक्स ही लेखकांना उत्तेजन आणि प्रोत्साहन देते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: director Sachin Kundalkar to direct movie for Netflix