दिग्दर्शक शशांक खैतान यांनी ट्विटरवरील नकारात्मक वातावरणामुळे केलं अकाऊंट डिलीट

shashank
shashank

मुंबई- 'सैराट' सिनेमाचा हिंदी रिमेक असलेल्या 'धडक' या सिनेमाचे दिग्दर्शक शशांक खैतान यांनी त्यांचं ट्वीटर अकाऊंट डिलीट केलं आहे. शशांक यांच्या म्हणण्यानुसार ट्वीटर हा नकारात्मकता पसरवण्याचा प्लॅटफॉर्म बनला आहे. अभिनेता सुशांत सिंह राजपुतच्या आत्महत्येनंतर बॉलीवूडचे दोन हिस्से झालेले दिसून येत आहेत. ट्विटवर दोन ग्रुप्स तयार झाले असून त्यांच्यामध्ये ट्विटर वॉर पाहायला मिळतंय. याच कारणामुळे दिग्दर्शक शशांक खैतान यांनी त्यांचं ट्विटर अकाऊंटंच डिएक्टिवेट करण्याचा निर्णय घेतलाय.

दिग्दर्शक शशांक खैतान यांनी त्यांचं ट्वीटर अकाऊंट डिलीट करण्याआधी शेवटच्या ट्विटचा स्क्रिनशॉट त्यांच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरुन पोस्ट केला होता. त्यांनी या ट्विटमध्ये लिहिलंय, 'ट्विटरमुळे हैराण झालोय. केवळ तिरस्कार आणि नकारात्मकता निर्माण करण्याचं मैदान बनलंय ट्विटर. दुःखाची बाब म्हणजे एवढा शक्तीशाली प्लॅटफॉर्म एक चांगलं जग बनवू शकला नाही. शांती आणि प्रेमाच्या आशिर्वादासोबत मी माझं ट्वीटर अकाऊंट डिलीट करत आहे.' यासोबत त्यांनी ट्विटर इंडियाला देखील टॅग केलं आहे. 

शशांक यांनी स्क्रीनशॉट इंस्टाग्रामवर शेअर करत लिहिलंय, 'अखेर मी माझं ट्वीटर अकाऊंट डिलीट केलं. हे खरं आहे की फॉलोअर्स आणि या प्लॅटफॉर्मची पोहोच पाहता मी बेकार आहे. मात्र माझं ठाम मत आहे की प्रत्येक आवाज हा तितकाच महत्वाचा आहे. आशा करतो की हा शक्तिशाली प्लॅटफॉर्म आणखी विकसित होऊ दे आणि याचा उपयोग प्रेम आणि आनंद पसरवण्यासाठी केला जाऊ दे.'

शशांक यांनी 'हमप्टी शर्मा की दुल्हनिया', 'बद्रीनाथ की दुल्हनिया', 'धडक' सारखे सिनेमे दिग्दर्शित केले आहेत.   

director shashank khaitan deactivated his twitter account says it is breeding ground for hate  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com