दिग्दर्शक एस.एस. राजामौली कोरोना चाचणी दोन आठवड्यानंतर आली निगेटिव्ह

संतोष भिंगार्डे
Thursday, 13 August 2020

आता एस. एस. राजामौली आणि त्यांच्या कुटुंबीयांनी कोरोनाला हरवल्याची बातमी समोर येत आहे.

मुंबई ः काही दिवसांपूर्वी 'बाहुबली' चित्रपटाचे दिग्दर्शक एस. एस. राजामौली यांना कोरोनाची लागण झाली होती. दोन आठवड्यांपूर्वीच राजामौली यांच्यासह त्यांच्या कुटुंबीयांचीही चाचणी पॉझिटिव्ह आली होती. पण आता एस. एस. राजामौली आणि त्यांच्या कुटुंबीयांनी कोरोनाला हरवल्याची बातमी समोर येत आहे.

बिग बॉस १४ साठी सलमान खान घेणार एका एपिसोडचे एवढे कोटी रुपये? 

स्वत: एस. एस. राजामौली यांनी ही माहिती दिली आहे.  आपल्या ट्विटर अकाउंटवरुन ही आनंदाची बातमी शेअर करताना त्यांनी लिहिले आहे की, "दोन आठवड्यांची प्रतीक्षा संपली आहे. आता आम्हाला कोणत्याही प्रकारची लक्षणे नाहीत. दोन आठवड्यानंतर आम्हा सगळ्यांचे रिपोर्ट्स निगेटिव्ह आले आहेत. डॉक्टर म्हणतात की आम्ही प्लाझ्मा देण्यासाठी पुरेशी अँटीबॉडीज विकसित केली आहे की नाही हे पाहण्यासाठी आणखी तीन आठवडे थांबावे लागेल."

   एस. एस. राजामौली आणि त्यांच्या कुटुंबाला दोन आठवड्यांपूर्वी हलकासा ताप आला होता. त्यानंतर त्यांनी कोरोना चाचणी करून घेण्याचा निर्णय घेतला. राजामौली यांनी आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवर असेही म्हटले आहे की, हलक्या तापानंतर त्यांनी कोविड-19 ची टेस्ट केली जी पॉझिटिव्ह आली होती. त्यानंतर डॉक्टरांच्या देखरेखीखाली संपूर्ण कुटुंब दोन आठवडे होम क्वारंटाईन होते. त्यानंतर आता संपूर्ण कुटूंबाचा कोरोना अहवाल निगेटिव्ह आला आहे.

मोठी बातमी! प्रार्थनास्थळे खुली करण्याबाबत राज्य सरकारने उच्च न्यायालयात दिली ही माहिती; वाचा सविस्तर

     राजामौली यांचा'आरआरआर' हा चित्रपट येणार आहे. या चित्रपटात रामचरण, आलिया भट्ट, अजय देवगन आणि श्रिया सरन यांनी मुख्य भूमिका साकारल्या आहेत.  यापूर्वी हा चित्रपट यावर्षी जुलैमध्ये प्रदर्शित होणार होता, पण लॉकडाऊनमुळे बंद झालेल्या चित्रपटाच्या शूटिंगमुळे आता निर्मात्यांनी पुढच्या वर्षी 8 जानेवारीला हा चित्रपट प्रदर्शित करण्याचा निर्णय घेतला आहे.

------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Director S.S. The Rajamouli corona test came negative after two weeks