'मुंगडा'च्या वादावर दिग्दर्शकाचे उत्तर

सकाळ न्यूज नेटवर्क
रविवार, 10 फेब्रुवारी 2019

मूळ गाण्याचे संगीतकार राजेश रोशन, गायिका उषा मंगेशकर व लता मंगेशकर यांनी देखील नवीन गाण्यावर आक्षेप घेतला आहे.

'मुंगडा' या गाण्याच्या रिमेकवरुन बऱ्याच टिका झाल्या आहेत. हे गाणे 'टोटल धमाल' चित्रपटासाठी चित्रीत करण्यात आले आहे. चित्रपटाचे निर्माते, दिग्दर्शक हे या गाण्यावरुन ट्रोल झाल्यानंतर या टिकांना अखेर चित्रपटांचे दिग्दर्शक इंद्र कुमार यांनी उत्तर दिले आहे.

कुमार म्हणाले, 'नव्वदच्या दशकातील माझ्या एका चित्रपटातले गाण्याचे सुध्दा रिक्रिएशन करण्यात आले होते. तेव्हा माझी परवानगी कुणीही घेतली नव्हती. हा सगळा अधिकार त्या-त्या म्युझिक कंपनीचा असतो. 1997 साली मी दिग्दर्शित केलेल्या 'इश्क' चित्रपटातील 'नींद चुराई मेरी...' हे रोहित शेट्टी याच्या 'गोलमाल रिटर्न्स'मध्ये वापरण्यात आले तेव्हा माझी परवानगी घेतली नव्हती. मुळ गाण्याचे काय करायचे ते कंपनी ठरवू शकते. शिवाय, एखाद्या जुन्या गाण्याप्रती सन्मान म्हणून हल्ली रिमेक करण्याचा ट्रेंड आहेच.'
 

'मुंगडा..मुंगडा..मै गुड की कली' हे मूळ गाणे 'इन्कार' या 1977 मधील चित्रपटाचे आहे. अभिनेत्री हेलन यांच्यावर हे आयटम साँग चित्रीत करण्यात आले होते. या गाण्यात काहीसा बदल करुन 'टोटल धमाल' या चित्रपटासाठी हे गाणे अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा वर चित्रीत करण्यात आले आहे. मूळ गाण्याचे संगीतकार राजेश रोशन, गायिका उषा मंगेशकर व लता मंगेशकर यांनी देखील नवीन गाण्यावर आक्षेप घेतला आहे. हा रिमेक करण्यापूर्वी आमच्याकडून परवानगी घेण्यात आली नव्हती, असे त्यांनी म्हटले आहे.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The directors reply on Mungada debate