B.Subhash: डिस्को डान्सरचे दिग्दर्शक बी.सुभाष यांच्या पत्नीचे निधन |Disco Dancer Director B Subhash Wife passed away | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

B.Subhash News

B.Subhash: डिस्को डान्सरचे दिग्दर्शक बी.सुभाष यांच्या पत्नीचे निधन

Mithun Chakraborty News: मिथुन चक्रवर्तीचा डिस्को डान्स आठवतोय, ज्या डान्सनं त्याला लोकप्रिय केलं त्या डिस्को डान्सर चित्रपटाचे दिग्दर्शक बी सुभाष यांना मोठा धक्का बसला आहे. त्यांच्या पत्नीचे तिलोत्तमा यांचे निधन झाले आहे. त्या गेल्या काही महिन्यांपासून आजारी होत्या. फिल्म निर्माता आणि लेखक, ( Bollywood Director News) दिग्दर्शक अशी ओळख असलेल्या बी सुभाष यांचे बॉलीवूडमध्ये मोठे नाव आहे. त्यांनी बराच काळ बॉलीवूडवर अधिराज्य केले. मात्र काही काळानं त्यांनी बॉलीवूडपासून लांब राहणे पसंत केले. सध्या त्यांच्यावर (Bollywood Actor) काळानं घाला घातला आहे. त्यांच्या पत्नीच्या निधनानं त्यांना मोठा धक्का बसला आहे.

बी सुभाष यांच्या पत्नीवर मुंबईतील कोकिलाबेन धीरुभाई अंबानी रुग्णालयात उपचार सुरु होते. त्यांना किडनीचा विकार झाला होता. अशातच बी सुभाष यांच्यापुढे आर्थिक समस्येला देखील सामोरं जावे लागल्याचे दिसून आले. त्यांनी अनेकदा याविषयी खंतही व्यक्त केली होती. सहा वर्षांपूर्वीच डॉक्टरांनी बी सुभाष यांच्या पत्नीविषयी सांगितले होते की, त्यांचे आजारपण गंभीर आहे. त्यावरील इलाजासाठी येणारा खर्चही प्रचंड आहे. मात्र सुभाष यांच्यापुढे पैशांचा प्रश्न शेवटपर्यत होता. गेल्या तीन वर्षांपासून तिलोत्तमा यांची प्रकृती ही आणखीनच खालावत चालली होती.

हेही वाचा: 'जो स्त्रीचा अपमान करेल...'; संजय राऊतांवरील कंगनाचं वक्तव्य Viral

80 च्या दशकांत ज्यांनी आपल्या हटक्या शैलीनं बॉलीवूडमध्ये मोठे नाव कमावले त्यामध्ये बी सुभाष यांच्या नावाचा समावेश होतो. ते दोन वर्षांपासून कोरोनामुळे आर्थिक संकटात सापडले होते. कोरोनाचा मोठा फटका मनोरंजन विश्वाला बसला होता. अशावेळी त्यातून कसा मार्ग काढावा असा प्रश्न त्यांच्यासमोर होता. पत्नीच्या आजारपणानं ते आणखी खचले होते. 78 वर्षांच्या बी सुभाष यांचा परिवार मोठा आहे. त्यांनी आपल्या करिअरमध्ये 18 चित्रपटांची निर्मिती केली. असं सांगितलं जातं की, त्यांना बॉलीवूडचा भाईजान सलमान खाननं मदतीचा हात दिला होता. याशिवाय मिथुननं देखील मदतीसाठी पुढाकार घेतला होता.

हेही वाचा: Video : Subodh Bhave यांचे राजकारण्यांवर टीकास्त्र

Web Title: Disco Dancer Director B Subhash Wife Passed Away Mithun Chakraborty Actor

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top