Disha Patani Father: दिशाच्या पपांना व्हायचंय 'महापौर'! टाईट फिल्डिंग | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Disha Patani Father

Disha Patani Father: दिशाच्या पपांना व्हायचंय 'महापौर'! टाईट फिल्डिंग

Disha Patani Father Election news: राज्याच्या राजकीय वर्तुळात सध्या वेगवेगळ्या प्रकारच्या घडामोडी होत आहेत. त्यामुळे कार्यकर्ते, सर्वसामान्य नागरिक यांच्यात संभ्रमाचे वातावरण आहे. ऐन दिवाळीच्या तोंडावर होत असलेल्या मोठया राजकीय निर्णयाचा परिणाम सोशल मीडियावरील नेटकऱ्यांवरही दिसून येतो आहे. त्यांच्या प्रतिक्रियांमधून वेगवेगळ्या प्रकारची सुचक विधानं ही लक्ष वेधून घेताना दिसत आहे. यासगळ्यात बॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री दिशा पटानीच्या वडिलांची बातमी समोर आली आहे.

दिशाच्या वडिलांना आता राजकारणात जाण्याचे वेध लागले आहे. सोशल मीडियावर जगदीश पटानी येत्या काळात महापौर पदाची निवडणूक लढवताना दिसणार आहेत. अशी चर्चा सुरु झाली आहे. इकोनॉमिक्स टाईम्सनं दिलेल्या एका वृत्तामध्ये आलेल्या माहितीनुसार येत्या काळात जगदीश सिंग पटानी हे राजकारणात दिसण्याची शक्यता आहे. त्यासाठी त्यांनी आतापासूनच मोर्चेबांधणी सुरु केली आहे. एका पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी यावेळी राजकीय प्रवेशाविषयी भाष्य केले होते.

जगदीश पटानी यांनी आता सनदी अधिकारी पदाचा स्वइच्छेने राजीनामा दिला आहे. यापुढील आपल्याला राजकारणात येवून समाजसेवा करण्याचा त्यांचा मानस असल्याचे बोलले जात आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या राजकीय प्रवेशाची चर्चा रंगली होती. आता पुन्हा एकदा सोशल मीडियावर येत्या काळात जगदीश हे बरेली शहरातून महापौर निवडणूक लढवण्याची शक्यता असल्याचे सांगण्यात येत आहे. जगदीश यांच्या राजकीय प्रवेशाची बातमी व्हायरल होताच नेटकऱ्यांनी त्यावर भन्नाट प्रतिक्रिया दिल्या आहेत.

हेही वाचा: Prashant Damle: 'दामले तुमचे हे नाटक बेकार आहे बरं का?'?

विशेष म्हणजे जगदीश यांच्या राजकीय प्रवेशाच्या आणि कोणत्या पदासाठी निवडणूक लढवणार याचे मोठमोठे फ्लेक्सही शहरात झळकल्याचे दिसून आले आहे. आपल्याला आतापर्यत वेगवेगळ्या पक्षांकडून विचारणा करण्यात आली असून त्याबाबत कोणताही ठाम निर्णय घेतला नसल्याचे सिंग यांनी म्हटले आहे. यावरुन आता नेटकऱ्यांनी दिशावर तोफ डागण्यास सुरुवात केली आहे. काहींनी तिला ट्रोल केले आहे.

हेही वाचा: PS 1 Row: 'त्यावेळी हिंदू धर्मच नव्हता'! कमल हासन आऊट ऑफ कंट्रोल!