PS 1 Row: 'त्यावेळी हिंदू धर्मच नव्हता'! कमल हासन आऊट ऑफ कंट्रोल! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Kamal hassan reaction on ps 1

PS 1 Row: 'त्यावेळी हिंदू धर्मच नव्हता'! कमल हासन आऊट ऑफ कंट्रोल!

Kamal Haasan Reaction: रामायण - महाभारत याशिवाय भारतीय पौराणिक कथांमधील अनेक प्रसंग घेऊन त्यावर चित्रपट निर्मिती केली जात आहे. त्यात ओम राऊत दिग्दर्शक आदिपुरुषनं तर सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. त्याच्या व्हायरल झालेल्या टीझरनं अनेकांना प्रतिक्रिया देण्यास भाग पाडले. त्या चित्रपटाचे राजकीय वर्तुळात देखील तीव्र पडसाद उमटल्याचे दिसून आले आहे.

यासगळ्यात टॉलीवूडमधील प्रसिद्ध अभिनेता कमल हासन यांनी नुकत्याच प्रदर्शित झालेल्या पोन्नियन सेल्वन अर्थात पीएस 1 वर प्रतिक्रिया दिली आहे. त्या जळजळीत प्रतिक्रियेनं अनेकांना धक्काच बसला आहे. विशेष म्हणजे मणिरत्नम यांनी हासन यांना खास स्क्रिनिंगसाठी निमंत्रित केले होते. ते झाल्यावर हासन यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.

कमल हासन यांनी पीएस 1 वर प्रतिक्रिया देताना म्हटले होते की, राजराजा चोलनच्या काळात हिंदू धर्म नावाची कोणतीही गोष्ट नव्हती. त्या चित्रपटामध्ये जे काही दाखवण्यात आले आहे ते न पटणारे आहे. पोन्नियन सेल्वन 1 च्या खास स्क्रिनिंगला गेले असताना कमल यांनी ही बोचरी टीका निर्माता आणि दिग्दर्शक यांच्यावर केली होती. त्यावरुन सोशल मीडियावर वेगवेगळ्या प्रतिक्रियांना उधाणही आले होते. कमल हासन हे नेहमीच त्यांच्या परखड वक्तव्यासाठी ओळखले जाणारे सेलिब्रेटी आहेत.

हेही वाचा: Prashant Damle: 'दामले तुमचे हे नाटक बेकार आहे बरं का?'?

पोन्नियन सेल्वन पाहिल्यानंतर हासन यांची प्रतिक्रिया होती की, राजराजा चौळ याला हिंदू म्हणून सादर करण्यात आले आहे. आता त्यावेळी धर्म नावाची एखादी गोष्ट अस्तित्वात होती का हा खरा प्रश्न आहे. मला तरी असे वाटते की, हे सगळे शब्द तेव्हा इंग्रजांनी त्यांच्या सोयीसाठी वापरले आणि आपल्यावर देखील अजुनही त्याच गोष्टींचा पगडा आहे. आपण त्याला फॉलो करतो. हासन यांच्या प्रतिक्रियेनंतर अनेकांनी त्या वक्तव्यावरुन नाराजी व्यक्त केल्याचे दिसून आले.

हेही वाचा: Katrina-Ranbir: रणबीर कतरिनाकडे पाहतच राहिला, 'नजर झुकीच नही!'