esakal | दिशाचा बिकनी लुक व्हायरल, टायगरची आई म्हणे, ‘वाह दिशू’
sakal

बोलून बातमी शोधा

disha patani bikini looks viral on instagram tiger mom comment on her

दिवाळीच्या सुट्टीनिमित्त अनेक सेलिब्रेटी सध्या वेगवेगळ्या ठिकाणी पर्यटनाचा आनंद लुटत आहेत. यातील काही सेलिब्रेटी आपआपल्या सोशल अकाउंटवरुन फोटो शेयर करत असल्याचे दिसून आले आहे. दिशाने मात्र बिकिनीमधील फोटो पोस्ट केले आहेत.

दिशाचा बिकनी लुक व्हायरल, टायगरची आई म्हणे, ‘वाह दिशू’

sakal_logo
By
सकाळ ऑनलाईन टीम

मुंबई - बॉलीवूडची अभिनेत्री दिशा पटानी ही अभिनयापेक्षा तिच्या फोटोंसाठी जास्त चर्चेत असते. तिची आणि टायगर श्रॉफच्या नावाची चर्चाही सतत होत असते. दिशा सोशल मीडियावर सतत अॅक्टिव्ह असणा-या दिशाचा सध्या एक हॉट लुक व्हायरल झाला आहे. त्याला नेटक-यांकडून चांगला प्रतिसाद मिळाला आहे.

दिवाळीच्या सुट्टीनिमित्त अनेक सेलिब्रेटी सध्या वेगवेगळ्या ठिकाणी पर्यटनाचा आनंद लुटत आहेत. यातील काही सेलिब्रेटी आपआपल्या सोशल अकाउंटवरुन फोटो शेयर करत असल्याचे दिसून आले आहे. दिशाने मात्र बिकिनीमधील फोटो पोस्ट केले आहेत. दिशा सध्या मालदिवमध्ये सुट्ट्यांचा आनंद घेत असून समुद्रकिनाऱ्यावरील बिकिनीतील काही फोटो इन्स्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट केले आहेत. दिशाच्या या हॉट आणि बोल्ड फोटोवर लाईक्स आणि कमेंटसचा पाऊस पडला आहे.

हे दोघे कलाकार ‘बागी २’ या चित्रपटात हे दोघं एकत्र झळकले होते. दिशाच्या चित्रपटांविषयी बोलायचे झाल्यास ती नुकतीच ‘मलंग’ या चित्रपटात झळकली होती. ती लवकरच सलमान खानच्या ‘राधे’ या चित्रपटातूनही प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. दिशाच्या त्या फोटोला टायगरच्या आईने कमेंट दिली आहे. ‘वाह दिशू’ म्हणत त्यांनी तिच्या फोटोंवर कमेंट केली आहे.

अक्षय कुमार ‘राम सेतू’ च्या वाटेवर; 'लक्ष्मी' पावली

मालदिवमध्ये दिशासोबत टायगर श्रॉफसुद्धा आहे. मालदिवसाठी गेल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. दिशा आणि टायगर एकमेकांना डेट करत असून दोघांनीही त्यावर मोकळेपणाने आपल्या नात्याचा सगळ्यांसमोर खुलासा केलेला नाही.