अक्षय कुमार ‘राम सेतू’ च्या वाटेवर; 'लक्ष्मी' पावली

सकाळ ऑनलाईन टीम
Saturday, 14 November 2020

अक्षय आता दिग्दर्शक राम सेतू या चित्रपटात दिसणार आहे. त्याविषयीची माहिती त्याने सोशल मीडियावर शेयर केली आहे. या चित्रपटाचा फर्स्ट लूक प्रसिध्द झाला असून त्यामुळे अक्षय एकदम चर्चेत आला आहे.

मुंबई - वाद, टीका याला सामोरं जावं लागलेल्य़ा लक्ष्मी चित्रपटा प्रेक्षकांच्या पसंतीस फारसा पडलेला नाही. भारताबरोबरच इतर देशांमध्येही हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. त्याला तिकडे चांगला प्रतिसाद मिळाला. दिवाळीत लक्ष्मीला मिळालेले यश पाहता आता अक्षयनं त्याच्या एका नव्या चित्रपटाची घोषणा केली आहे.

अक्षय आता दिग्दर्शक राम सेतू या चित्रपटात दिसणार आहे. त्याविषयीची माहिती त्याने सोशल मीडियावर शेयर केली आहे. या चित्रपटाचा फर्स्ट लूक प्रसिध्द झाला असून त्यामुळे अक्षय एकदम चर्चेत आला आहे. अक्षयच्या आगामी चित्रपटाचे नाव ‘राम सेतू’ आहे. या चित्रपटात अक्षय मुख्य भूमिकेत दिसणार आहे. अक्षयने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर ‘राम सेतू’ चित्रपटाची घोषणा करत फर्स्ट लूक शेअरही केला आहे.

हे ही वाचा: मेगास्टार चिरंजीवी कोरोना व्हायरसने संक्रमित नाहीत, पहिल्या टेस्टमध्ये कोरोना पॉझिटीव्ह येण्याचं 'हे' होतं कारण  

यात ‘राम सेतू’ या चित्रपटाच्या पोस्टरमध्ये अक्षयने राखाडी रंगाचा शर्ट परिधान केला आहे. त्यावर काळ्या रंगाची जीन्स परिधान केली आहे. तसेच त्याने चष्मा लावला आहे. अक्षयचा हा वेगळा लूक पाहाता चाहत्यांमध्ये चित्रपटाबाबत उत्सुकता पाहायला मिळते.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Akshay Kumar (@akshaykumar)

 

अक्षय कुमारच्या ‘राम सेतू’ या चित्रपटाचे दिग्दर्शन अभिषेक शर्मा करणार आहेत. त्यांनी या पूर्वी अक्षयसोबत ‘मिशन मंगल’ चित्रपटात काम केले आहे.

हे ही वाचा: 'द कपिल शर्मा शो'मध्ये गोविंदाच्या एंट्रीनंतर कृष्णा अभिषेकची एक्झिट  

आता या चित्रपटात अक्षयसोबत आणखी कोणते कलाकार दिसणार हे पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. लक्ष्मी चित्रपटाच्या वेळी अक्षयला मोठ्या टीकेला सामोरं जावे लागले होते. त्याची सुरुवात त्या चित्रपटाच्या नावावरुन झाली. याप्रकरणी एका संघटनेने न्यायालयात धाव घेतली होती. अखेर अक्षयला  त्या चित्रपटाचे नाव बदलावे लागले. ओटीटी प्लॅटफॉर्मवर तो रिलिज करण्यात आला होता. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: akshay kumar release first look of ram setu movie