Disha Patani Boyfriend : दिशाच्या आयुष्यात 'टायगर' नाहीतर 'अलेक्झांडर'!

अलेक्झांडच्या हातावरील तो टॅटू आता अनेकांच्या प्रतिक्रियेचा विषय आहे.
Disha Patani breaks silence on relationship with Alexander Alex
Disha Patani breaks silence on relationship with Alexander Alex esakal

Disha Patani breaks silence on relationship with Alexander Alex : बॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री दिशा पटानी ही आता तिच्या बॉयफ्रेंडच्या नावामुळे आणि त्यानं हातावर काढलेल्या टॅटूमुळे चर्चेत आली आहे. अलेक्झांडर हा तिचा बॉयफ्रेंड असून काही दिवसांपासून या दोन्ही सेलिब्रेटींच्या नावाची चर्चा रंगलेली दिसत आहे.

दिशा ही तिच्या प्रोफेशनल लाईफपेक्षा पर्सनल लाईफवरुन ट्रेंडिंगचा विषय आहे. तिचा चर्चेतील बॉयफ्रेंड अलेक्झांडरचा व्हिडिओ चाहत्यांच्या पसंतीस पडला आहे. त्यानं हातावर एक टॅटू काढला आहे त्यावरुन चाहत्यांनी दोघांच्या नात्यावर शिक्कामोर्तब केले आहे.

Also Read - Adhik Shravan Maas : अधिक श्रावण मास चित्तशुद्धीचा पर्वकाळ

अलेक्झांडच्या हातावरील तो टॅटू आता अनेकांच्या प्रतिक्रियेचा विषय आहे. दिशानं तिच्या इंस्टा स्टोरीवरुन तो व्हिडिओ शेयर केला असून त्यावरील नेटकऱ्यांच्या, चाहत्यांच्या कमेंट भन्नाट आहेत. दुसऱ्या व्हिडिओमध्ये दिशा आणि टायगरची बहिण कृष्णा पोझ देत फोटो काढताना दिसत आहे. अलेक्झांडरनं जो टॅटू काढला आहे त्यात दिशाचा चेहरा दिसून येतो आहे.

सध्या अलेक्झांडरच्या हातावरील तो टॅटू नेटकऱ्यांचे आणि दिशाच्या चाहत्यांचे लक्ष वेधून घेताना दिसतो आहे. सोशल मीडियावर तो व्हिडिओ वेगानं व्हायरल होतो आहे. त्यावर नेटकऱ्यांनी भन्नाट कमेंट्स देखील दिल्या आहेत. एका युझर्सनं प्रतिक्रिया दिली आहे की, तुम्ही दोघेही खूपच सुंदर दिसता आहात. तुमच्या पुढील आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा.

Disha Patani breaks silence on relationship with Alexander Alex
Kangana Reaction On Aishwarya : 'ऐश्वर्या म्हणजे....!' कंगनाला राहवलं नाही, मनातलं गेली बोलून!

दिशानं तो व्हिडिओ शेयर करताना त्यावर एक कॅप्शन लिहिली आहे. ती म्हणते की, अलेक्सीसोबत मी जोडले गेले आहे. मी खूपच भाग्यवान आहे की, मला तुझ्यासारखा मित्र मिळाला. यासोबत दिशानं तीन हार्ट इमोजी देखील शेयर केले आहेत. त्याची जोरदार चर्चा होताना दिसत आहे. गेल्या काही दिवसांपासून दिशा आणि अलेक्सविषयी बोलले जात आहे.

कोण आहे अलेक्झांडर?

सध्या दिशाचा बॉयफ्रेंड म्हणून अलेक्झांडरचे नाव चर्चेत आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांचे सोशल मीडियावर व्हायरल झालेले फोटोही चाहत्यांच्या कमेंट्सचा खास विषयही आहे. यासगळ्यात नेटकरी गुगलवर दिशाचा बॉयफ्रेंड अलेक्झांडर हा नेमका आहे तरी कोण, याचा शोध घेताना दिसत आहे.

Disha Patani breaks silence on relationship with Alexander Alex
Ghoomer Review: एक हात नसला म्हणून काय झालं, मनात आणलं तर काहीही अशक्य नाही सांगणारा 'घूमर'

अलेक्झांडर हा एक व्यावसायिक मॉडेल आहे. त्यानं गिरगिट नावाच्या वेबसीरिजमधून डेब्यू केले होते. तेव्हा पासून तो प्रसिद्धीच्या झोतात आला आहे. त्याचे दिशासोबत नाव घेतले जाऊ लागले आहे. दिशाच्या आगामी प्रोजेक्टविषयी बोलायचे झाल्यास, ती साऊथचा सुपरस्टार सूर्यासोबत 'सूर्या ४२' चित्रपटामध्ये दिसणार आहे. याबरोबरच करण जोहरच्या 'योद्धा'मध्ये महत्वाच्या भूमिकेत दिसेल. तसेच सिद्धार्थ मल्होत्रा आणि राशी खन्नासोबतही ती दिसणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com