'या' हॉलीवूड स्टारसोबत डेटला जायचं आहे, दिशा पटानीने व्यक्त केली इच्छा

दिपाली राणे-म्हात्रे
Wednesday, 23 December 2020

वर्ष अखेर आल्याने सर्वजण नवीन वर्षाच्या सेलिब्रेशनची तयारी करतायेत. यात बॉलीवूड सेलेब्सही मागे नाहीत.  अभिनेत्री दिशा पटानीने नवीन वर्षाची सुरुवात कशा प्रकारे करणार याचं प्लानिंग शेअर केलं आहे.

मुंबई - बॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री दिशा पटानीने तिच्या ग्लॅमरस अंदाजाने आणि तिच्या अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. सोशल मिडियावर ऍक्टीव्ह असणारी दिशा अनेकदा तिचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करत चाहत्यांना अपडेट देत असते. आता वर्ष अखेर आल्याने सर्वजण नवीन वर्षाच्या सेलिब्रेशनची तयारी करतायेत. यात बॉलीवूड सेलेब्सही मागे नाहीत.  अभिनेत्री दिशा पटानीने नवीन वर्षाची सुरुवात कशा प्रकारे करणार याचं प्लानिंग शेअर केलं आहे.

हे ही वाचा: सारा-वरुणने करुन दिली जुन्या दिवसांची आठवण, 'तुझको मिर्ची लगी' रिलीज  

अभिनेत्री दिशा पटनीने सोशल मीडियावर २०२१ हे महत्वाचं का असेल याचं कारण सांगत तिची इच्छा व्यक्त केली आहे. दिशाने म्हटलंय की मी नवीन वर्षानिमित्त हॉलीवूड स्टार बेयॉन्सेसोबत डेटवर जाणार आहे.' हे एक पोल ट्‌विट होतं, ज्यामध्ये असं विचारले गेलं होतं की '२०२१ हे वर्ष खास असेल कारण...' यावर उत्तर देत दिशाने ही टिप्पणी केली आहे.

दिशाचं हे ट्‌विट सध्या खूप व्हायरल होतंय. तिच्या या ट्‌विटवर टायगर श्रॉफचे चाहते मजेशीर प्रतिक्रिया देत आहेत.बॉलीवूडमध्ये टायगर श्रॉफ आणि दिशा पटानी यांची जोडी सगळ्या चर्चित जोडीपैकी एक आहे. काही दिवसांपूर्वीच दिशा-टायगर यांना मालदीवमध्ये व्हेकेशन एन्जॉय करताना पाहण्यात आलं होतं. या व्हेकेशनचे अनेक फोटो त्यांनी शेअर केले होते. दिशाच्या सिनेमांविषयी सांगायचं झालं तर दिशा सलमान खानसोबत आगामी 'राधे युअर मोस्ट वॉन्टेड भाई'मध्ये झळकणार आहे. .याआधी दिशा 'मलंग' सिनेमामध्ये शेवटची झळकली होती.  

disha patani plans dinner date with this hollywood star in 2021 tweeted information  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: disha patani plans dinner date with this hollywood star in 2021 tweeted information