सारा-वरुणने करुन दिली जुन्या दिवसांची आठवण, 'तुझको मिर्ची लगी' गाणं रिलीज

दिपाली राणे-म्हात्रे
Tuesday, 22 December 2020

९० च्या दशकातील जवळपास सगळ्यांनाच या गाण्याविषयीची उत्सुकता होती. करिश्मा कपूर आणि गोविंदा यांच्यावर शूट झालेलं हे गाणं बॉलीवूडच्या सुपरहिट गाण्यांपैकी एक आहे.

मुंबई- सारा अली खान आणि वरुण धवन स्टारर आगामी 'कुली नंबर 1′ या सिनेमातील 'तुझ को मिर्ची लगी…' हे गाणं रिलीज झालं आहे. या गाण्यात दोघेही सुरुवातीपासूनच धमाल करताना दिसत आहे. ९० च्या दशकातील जवळपास सगळ्यांनाच या गाण्याविषयीची उत्सुकता होती. करिश्मा कपूर आणि गोविंदा यांच्यावर शूट झालेलं हे गाणं बॉलीवूडच्या सुपरहिट गाण्यांपैकी एक आहे. आता डेविड धवन यांनी पुन्हा एकदा या गाण्याच्या माध्यमातून कुमार सानू आणि अलका याग्निक यांच्या आवाजाची जादू पसरवली आहे. 

हे ही वाचा: 'मी जगाची पर्वा न करता सगळ्यांसमोर येईन', राखी सावंतच्या पतीची कबुली     

यावेळी या गाण्यात गोविंदा आणि करिश्मा कपूर नाही तर सारा अली खान आणि वरुण धवन यांचा डान्स आणि दोघांची केमिस्ट्री खूपच जबरदस्त असल्याचे दिसून येतंय. या नवीन जोडीने गोविंदा आणि करिश्मा यांच्या पावलावर पाऊल ठेवण्याचा पूर्ण प्रयत्न केला आहे. विशेष म्हणजे हे गाणं रिलीज होताच काही वेळातच याला जवळपास 2 लाखांपेक्षा जास्त व्ह्युज मिळाले आहेत.

या व्हिडिओत वरुण आणि सारा धमाकेदार पद्धतीने थिरकताना दिसतायेत.हे नवीन गाणं देखील अलका याज्ञिक आणि कुमार सानू यांनी गायलं असून आनंद-मिलिंद यांनी संगीत दिलं आहे. या गाण्याबद्दल डेव्हिड धवन म्हणाले की, मूळ 'कुली नंबर १' ची गाणी खूप लोकप्रिय आणि सदाबहार आहेत. यामुळे मला वाटतं की ही गाणी या रिमेकला हमखास यश मिळवून देतील. तसंच मी कोणत्याही सिनेमाचा रिमेक करताना ब्लॉकबस्टर गाणी घेणार असल्याचं यापूर्वीच स्पष्ट केलं आहे' असं देखील ते म्हणाले.

'कुली नंबर १' हा सिनेमा २५ डिसेंबर रोजी ख्रिसमसच्या दिवशी रिलीज होत आहे. सिनेमाचा ट्रेलर समोर आल्यानंतर आता यातील गाणी देखील प्रेक्षकांची सिनमाविषयीची उत्सुकत वाढवत आहेत. 

coolie no 1 film new song tujhko mirchi lagi released sara varun  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: coolie no 1 film new song tujhko mirchi lagi released sara varun