Disha Patani: दिशाचा 'नवा बकरा','त्या' व्हिडीओवरनं लोक करु लागले ट्रोल...Disha Patani | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Disha Patani spotted with best friend users called him naya bakra after break up with tiger shroff

Disha Patani: दिशाचा 'नवा बकरा','त्या' व्हिडीओवरनं लोक करु लागले ट्रोल...

Disha Patani: बॉलीवूड अभिनेत्री दिशा पटानी सोशल मीडियावर भलतीच सक्रिय पहायला मिळते. पापाराझीचे कॅमेरे तर तिच्या मागावरच असतात. काहीच नाही तर टायगर श्रॉफ सोबतच्या तिच्या नात्यावरनं तर ती नेहमीच चर्चेत पहायला मिळते. अर्थात आतापर्यंत ना टायगर,ना दीशा कोणीच या विषयावर मोकळेपणानं बोललेलं नाही. (Disha Patani spotted with best friend users called him naya bakra after break up with tiger shroff)

हेही वाचा: Lalit Prabhakar: 'एकटेपणातच सुख...', ललित प्रभाकर स्पष्टच बोलला

एकदा टायगर म्हणाला होता,''मी आणि दिशा खूप चांगले मित्र आहोत आणि तो स्वतः सिंगल आहे''. मध्ये त्यांच्या ब्रेकअपची बातमी देखील भलतीच गाजली होती. पण चाहते मात्र या बातमीवर विश्वास ठेवायला तयार नव्हते. सध्या ती आपला जिम ट्रेनर आणि मित्र अलेक्झेंडर एलेक्स सोबत फिरताना दिसतेय,त्यामुळे चाहते मात्र चक्रावून गेलेयत आणि खूप वेगवेगळ्या गोष्टी बोलू लागलेयत.

Disha Patani spotted with best friend users called him naya bakra after break up with tiger shroff

Disha Patani spotted with best friend users called him naya bakra after break up with tiger shroff

त्याचं झालं असं की दिशा पटानीला मुंबईत अलेक्झेंडर एलेक्ससोबत पाहिलं गेलं होतं. यावेळी तो दिशाबद्दल खूपच प्रोटेक्टिव्ह दिसून आला. दिशा आणि एलेक्स बान्द्र्यात एका रेस्टॉरंटमध्ये गेले होते. तेव्हा पापाराझीच्या एका ग्रुपनं त्यांना अक्षरशः घेरलं. यादरम्यान एक चाहतादेखील दिशासोबत बातचीत करताना दिसला. पण अलेक्झेंडर एलॅक्सने बॉडीगार्डचं काम यावेळी केलं. दिशाच्या खांद्यावर हात ठेवत एलेक्सनं तिला कव्हर केलं आणि पुढे चालत रहायला सांगितलं.

दिशा जोपर्यंत तिच्या कारमध्ये बसली नाही,तोपर्यंत तिच्या या नव्या मित्राने अभिनेत्रीला एकटं सोडलं नाही. दिशापर्यंत कोणीही पोहोचणार नाही याची त्यानं नीट काळजी घेतली. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओत आपल्याला हे पाहता येईल, हा व्हिडीओ आम्ही बातमीत जोडलेला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर आता लोक त्यावर कमेंट करू लागलेयत.

हेही वाचा: Hardeek- Akshaya Wedding Card: 'होऊ दे खर्च'...हार्दिक-अक्षयाच्या लग्नाच्या पत्रिकेवर चांदीचा विडा

एका नेटकऱ्यानं लिहिलं आहे-'दिशा टायगर अजून जीवंत आहे'. तर आणखी एकानं लिहिलं आहे-'हिचं वैयक्तिक आयुष्य असं आता राहिलेलं नाही'. तर एकाने चक्क म्हटलं की-''वा,नवीन बकरा...'', एका नेटकऱ्यानं लिहिलं आहे की-'दिशाच्या या बेस्ट फ्रेंडनेच तिचं आणि टायगरचं ब्रेकअप केलं आहे. आता स्वतः फायदा घेईल'.

माहितीसाठी सांगतो की,अलेक्झेंडर एलेक्स अभिनेत्री दिशा पटानीचा जीम ट्रेनर आहे. आणि तिचा मित्र देखील. त्यानं 'गिरगिट' या वेबसिरीजमधून अभिनयात पदार्पण देखील केलं आहे. त्याला हिंदी बोलायला येत नव्हतं,पण त्यानं ही भाषा आत्मसात केली. दिशा पटानी देखील सोशल मीडियावर आपले फोटो शेअर करताना दिसते.

हेही वाचा: Varun Dhawan : वरूण धवनला झालेला 'तो' आजार गंभीर का आहे ? वाचा लक्षणे आणि उपचार

एलेक्सने एकदा मुलाखतीत दिशाचं तोंडभरून कौतूक केले होते. तेव्हा तो हिंदी शिकत होता. आणि त्याच्यासाठी ते खूपच कठीण होतं,त्यानं त्यासाठी अनेक हिंदी सिनेमे पाहिले. ते देखील सबटायटलचं सहाय्य न घेता. तेव्हाच तो म्हणाला होता की, दिशा माझ्यासोबत आहे यासाठी मी स्वतःला भाग्यशाली समजतो. ती त्याच्यासाठी खूपच खास असल्याचं देखील त्यानं नमूद केलं होतं.