Lalit Prabhakar: 'एकटेपणातच सुख..', ललित प्रभाकर स्पष्टच बोलला Marathi Actor Sunny Movie | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Marathi Actor Lalit Prabhakar Post, 'Alone Protects Me....', Sunny movie

Lalit Prabhakar: 'एकटेपणातच सुख...', ललित प्रभाकर स्पष्टच बोलला

Lalit Prabhakar: मराठी अभिनेता ललित प्रभाकर हा अनेक मुलींचा हार्टथ्रोब आहे हे आपल्या सगळ्यांनाच माहित आहे. अनेक अभिनेत्रींसोबत त्याचं नाव आतापर्यंत जोडलं गेलं आहे. पण रिलेशनशीपमध्ये गुंतणं यात ललितला काही रस नाही हे अनेकदा दिसूनही आलं आहे. असो,आता त्यानं सोशल मीडियावर एक फोटो पोस्ट करत त्याला दिलेल्या कॅप्शनमधून आपल्या मनातल्या भावना जणू समोर आणल्या आहेत. यावर अनेक मराठी कलाकारांनी प्रतिक्रिया नोंदवल्या आहेत. (Marathi Actor Lalit Prabhakar Post, 'Alone Protects Me....', Sunny movie)

हेही वाचा: Sai Tamhankar: 'त्याला पाहिलं की सईच्या डोळ्यात दिसते चमक?', क्रांती रेडकरनं उघडं केलं सईचं पितळ

ललित प्रभाकर हा सध्या त्याच्या आगामी सनी सिनेमामुळे चर्चेत आहे. अर्थात नेहमीप्रमाणेच या सिनेमातला त्याचा लूकही लक्ष वेधून घेत आहे. ललितनं याच सिनेमातील त्याचा एक फोटो पोस्ट करत Alone is what i have...Alone Protects Me...असं कॅप्शन दिलं आहे. या त्याच्या पोस्टवर अनेक चाहत्यांनी प्रतिक्रिया देताना त्याच्या डोळ्यांची प्रशंसा केलेली दिसत आहे. तर अनेकांनी त्याच्या एकटेपणाच्या पोस्टला देखील पाठिंबा दिला आहे. सनी सिनेमाचा दिग्दर्शक हेमंत ढोमेनं तर त्याच्या फोटोला पाहून शेरलॉकची उपमा दिली आहे.

हेही वाचा: Sai Tamhankar: असं काय घातलंय सईने की तेजस्विनी पंडीत म्हणाली,अबब!

खरं तर ललित प्रभाकरच्या सनी सिनेमाची कथाच ही मुळी घरापासून लांब राहणाऱ्या सर्वांची गोष्ट आहे. ललित प्रभाकर म्हणजेच 'सनी' शिक्षणासाठी परदेशात गेल्यावर पाठीमागे काहीतरी सोडून आल्याची त्याला सतत जाणीव होताना सिनेमात दिसणार आहे. असं म्हणतात, लांब गेल्यावरच जवळच सापडतं. असाच काहीसा अनुभव सिनेमात सनीला येताना आपण पाहू. सनीच्या मनात चाललेली ही चलबिचल नेमकी कशासाठी आहे, याचे उत्तर आपल्याला १८ नोव्हेंबरला मिळणार आहे.

पण याआधीच ललितनं मात्र सांगून टाकलंय भले सिनेमाच्या माध्यमातून त्याला एकटेपणा टोचतोय असं सांगण्यात आलं असेल पण प्रत्यक्ष आयुष्यात मात्र या एकटेपणातच सुख आहे, तो एकटेपणा जो मला मिळालाय तो मला आवडतो आणि तो मला सुरक्षितही ठेवतो असं चक्क त्यानं म्हणत अनेक जणींच्या हृद्यावर घाव केला आहे.