सुरवातीला मोजकेच काही रुपये घेऊन मुंबईत आलेली 'ही' अभिनेत्री... आता बनलीय कोट्यवधींची मालकीण, कोण आहे ती अभिनेत्री वाचाच

disha patani who came to mumbai with rs 500 and her struggle to become actress
disha patani who came to mumbai with rs 500 and her struggle to become actress
Updated on

'ओ साथी', 'स्लो मोशन', 'हुई मलंग', 'कौन तुझे' या अनेक गाण्यातील मुख्य भूमिका साकारणारी अभिनेत्री दिशा पटानी ही सुरवातीला एका चॉकलेटच्या जाहिरातीतून करिअरची सुरूवात केली होती. सुरवातीला फक्त ५०० रुपये घेऊन दिशा मुंबईत आली होती आणि एक वेळ अशी आली की जेव्हा तिच्याकडे अजिबात पैसे नव्हते.  

दिशा पटानीचे आज लाखो चाहते आहेत. अत्यंत कमी वेळात दिशाने बॉलिवूडमध्ये आपलं स्थान निर्माण केलं. सुशांत सिंह राजपूतच्या ‘एम.एस.धोनी- द अनटोल्ड स्टोरी’ या चित्रपटातून तिने पदार्पण केलं. पहिल्याच चित्रपटासाठी तिला वाहवा मिळाली.सुरवातीला बॉलिवूडमध्ये काम करण्याचं स्वप्न साकार करण्यासाठी दिशाने बऱ्याच अडचणींचा सामना केला आहे.सुरुवातीच्या दिवसात जाहिराती आणि चित्रपटांच्या ऑडिशन्ससाठी दिशाने खूप प्रयत्न केले.

काम मिळालं नाही तर घरभाडं कसं देऊ याचा सतत ताण तिच्यावर होता. दिशाच्या पहिल्याच चित्रपटात ऐनवेळी तिला नाकारून दुसऱ्या अभिनेत्रीला घेण्यात आलं. मात्र या नकाराकडेही तिने सकारात्मक दृष्टीकोनातून पाहिलं. दिशाने एका मुलाखतीत असं सांगितलं की, 'नकार तुम्हाला अधिक खंबीर बनवतो हे मला सुरुवातीलाच शिकायला मिळालं. ज्या कारणासाठी तुम्हाला नकार मिळतो, तेव्हा त्यासाठी तुम्ही अधिक मेहनत घेता'. 

अभिनेत्री होण्याचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी दिशाने अर्ध्यावरच शिक्षण सोडलं होतं. त्यावेळी शिक्षण अर्धवट सोडून ती मुंबईला आली. कोणत्याही ओळखीशिवाय एका नवीन शहरात येऊन राहणं तिच्यासाठी काही सोपी गोष्ट नव्हती. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com