500 रुपये घेऊन मुंबईत आली, सक्सेसनंतर गिफ्ट केलं 5 कोटींचं घर

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 13 जून 2019

बॉलिवूड अभिनेत्री दिशा पाटनीचा आज वाढदिवस. नुकताच दिशाचा भारत हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर खूप चांगले कलेक्शन केले आहे. दिशा पटना जेव्हा सुरवातीला मुंबईत आली तेव्हा ती 500 रुपये घेऊन मुंबईत आली होती. आता तिने स्वतःला 5 कोटी रुपयांचे घर गिफ्ट केले आहे.

मुंबई: बॉलिवूड अभिनेत्री दिशा पाटनीचा आज वाढदिवस. नुकताच दिशाचा भारत हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर खूप चांगले कलेक्शन केले आहे. दिशा पटना जेव्हा सुरवातीला मुंबईत आली तेव्हा ती 500 रुपये घेऊन मुंबईत आली होती. आता तिने स्वतःला 5 कोटी रुपयांचे घर गिफ्ट केले आहे.

दिशाने बॉलिवूडमध्ये सुशांत सिंग राजपूतसोबत सुरवातीला एमएस धोनी: द अनटोल्ड स्टोरीमधून पदार्पण केले होते. या चित्रपटात भलेही तिचा छोटा रोल होता पण तरीदेखील रसिकांच्या चांगलीच लक्षात राहिली. बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्याआधी दिशाने तेलगू चित्रपट लोफरमध्ये काम केले होते. त्यानंतर तिने एक म्युझिक व्हिडिओ करून बॉलिवूडमधील करियरला सुरूवात केली.

दिशा जेव्हा मुंबईत करियर करण्यासाठी आली होती. त्यावेळी तिच्याकडे फक्त पाचशे रुपये होते. मात्र आता तिचे स्वतःचे वांद्रे येथे घर आहे. हे अपार्टमेंट तिने 2017 साली स्वतःला गिफ्ट केले आहे. दिशानं या घराचं नाव लिटिल हट असं ठेवले आहे. या घराची किंमत 5 कोटी रुपये इतकी आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Disha patni came to Mumbai with only 500 rupees now gifted herself 5 crore rs house