Disha Vakani : दयाबेन झाली ट्रोल; व्हायरल व्हिडिओवरून नेटकऱ्यांनी विचारले प्रश्न | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Disha Vakani Latest News

Disha Vakani : दयाबेन झाली ट्रोल; व्हायरल व्हिडिओवरून नेटकऱ्यांनी विचारले प्रश्न

Disha Vakani Latest News ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ हा टीव्ही जगतातील सर्वांत हिट आणि आवडता शो आहे. शोच्या स्टारकास्टची फॅन फॉलोइंगही अप्रतिम आहे. तारक मेहता शोमध्ये सर्वांत जास्त प्रेम कोणत्या पात्राला मिळाले असेल तर ते म्हणजे दयाबेन. दिशा वकाणीने (Disha Vakani) दयाबेनची भूमिका इतकी चांगली साकारली आहे की सगळेच तिचे चाहते झाले आहेत. आता दिशाचा एक जुना व्हिडिओ व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहून युजर्स भडकले आहेत.

दिशा वकाणीला चाहत्यांनी पारंपरिक पोशाखामध्ये पाहिले आहे. तारक मेहता शोमध्येही दिशा साडीत दिसते. परंतु, आता दिशाचा एक जुना बोल्ड डान्सिंग व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हायरल व्हिडिओमध्ये दिशा वकाणी सिझलिंग बॅकलेस बिकिनी टॉपमध्ये डान्स करताना दिसत आहे. दिशाने बिकिनी (Disha Vakani) टॉपला मॅचिंग शॉर्ट स्कर्ट घातला आहे. दिशाचा हा व्हिडिओ बराच जुना आहे. मात्र, सध्या सोशल मीडियावर (Social media) धुमाकूळ घालत आहे.

हेही वाचा: Alia Bhatt : आलियाचे प्रेग्नेंसी लूक खूपच स्टायलिश

दिशा वकाणीला बिकिनी टॉपमध्ये पाहून युजर्स थक्क झाले आहेत. दिशाच्या बोल्ड अवतारावर काही लोक मनं हरली असतानाच ट्रोल करणारे अनेकजण आहेत. दिशा वकाणीला ट्रोल करताना युजरने लिहिले, संस्कार नावाची कोणतीही गोष्ट नाही. आणखी एका युजरने लिहिले, व्हिडिओने संस्काराबद्दलचे माझे मत खराब केले आहे.

दिशा वकाणीने तिच्या करिअरच्या शिखरावर असलेल्या तारक मेहता का उल्टा चष्मा शोला बाय म्हटलं. २०१७ मध्ये दिशा प्रसूती रजेवर गेली होती. मुलीच्या जन्मानंतरही ती शोमध्ये परतली नाही. आता दिशा वकाणीला शोमध्ये परतणे अशक्य आहे. कारण, शोमध्ये दयाबेनच्या भूमिकेत आणखी एका अभिनेत्रीला कास्ट करण्याची चर्चा सुरू आहे. नवीन दयाबेनला पाहण्यासाठी चाहतेही उत्सुक आहेत.

Web Title: Disha Vakani Dayaben Taarak Mehta Ka Ooltah Chashmah Tv Serial

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..