Miss Universe च्या मंचावर अवतरली भारताची 'गोल्डन बर्ड',दिविता रायवर खिळल्या जगाच्या नजरा... Divita Rai | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Miss Universe  Contestant Divitra Rai

Miss Universe च्या मंचावर अवतरली भारताची 'गोल्डन बर्ड',दिविता रायवर खिळल्या जगाच्या नजरा...

Miss Universe : संपूर्ण जगातील सौंदर्यवतींना एकाच मंचावर आणण्याची किमया घडवून आणतो तो मिस युनिव्हर्स स्पर्धेचा मंच. याच ७१ व्या मिस युनिव्हर्स स्पर्धेत आपल्या स्वप्नांना सत्यात उतरवण्यासाठी सामिल झाली आहे भारताची दिविता राय. (Miss Universe Contestant Divitra Rai)

हेही वाचा: Apurva Nemlekar: 'वरूण तू मला एका गोष्टीचं आश्वासन दिलं होतं.. ; अपूर्वाची पोस्ट अन् चर्चेला उधाण

आपल्या माहितीसाठी इथं सांगतो की तेलंगणाची दिविता राय अमेरिकेतील न्यू ऑरलियन्स मध्ये होणाऱ्या ७१ व्या मिस युनिव्हर्स स्पर्धेत भारताचं प्रतिनिधित्व करण्यास सज्ज आहे. तिचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये ती गोल्डन बर्ड बनून भारताचं प्रतिनिधित्व करताना दिसत आहे.

हेही वाचा: Sanjay Dutt: 'मरण येणार असेल तर येऊ देत..', कॅन्सरची ट्रीटमेंट घ्यायला तयारच नव्हता संजय दत्त, कारण...

दिविता राय सोन्याचे पंख लावलेला गोल्डन आऊटफिट घालून मिस युनिव्हर्स स्टेजवर पोहोचली आणि उपस्थितांची दाद मिळवून गेली. सोशल मीडियावर दिविताचा हा लूक जोरदार व्हायरल होत आहे. केवळ भारतातून नाही तर जगभरात काना-कोपऱ्यात वसलेले भारतीय दिविताच्या जिंकण्याची कामना करत आहेत. तेलंगणा मध्ये राहणारी दिविता राय एक मॉडेल आहे,जी ७१ व्या मिस युनिव्हर्स स्पर्धेत भारताचं प्रतिनिधित्व करताना दिसणार आहे.

हेही वाचा: Sakshi Tanwar आणि राम कपूरचा १७ मिनिटांचा इंटिमेट सीन आजही चर्चेत; शूटच्या वेळेस अभिनेत्रीनं अनेकदा...

स्पर्धेसाठी दिवितानं खास आपल्या देशाला शोभेल असाच लूक ठेवण्यावर भर दिलेला दिसला. भारताची विविधता आणि संस्कृतीचं प्रतिनिधित्व करताना दिविता खूपच छान दिसत होती.

दिवितानं इन्स्टाग्रामवर आपल्या या खास लूकचा व्हिडीओ शेअर केला आहे. तिनं व्हिडीओला कॅप्शन दिलं आहे की,'या गोल्डन बर्डनं विश्वात आपलं स्थान बनवलं आहे..', ही पोस्ट दिवितानं शेअर केल्यानंतर तिच्या चाहत्यांनी त्यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया नोंदवल्या आहेत.

एका नेटकऱ्यानं लिहिलं आहे की, 'भारताचं प्रतिनिधित्व तू खूप उत्तम करत आहेस. तर आणखी एकानं लिहिलं आहे की,गोल्डन बर्ड दिविता राय'.

टॅग्स :miss universe