Divya Bharti : 'मृत्यूनंतरही अनेकांच्या स्वप्नात यायची दिव्या'! आईनचं खुलासा करुन सांगितलं होतं...

बॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री दिव्या भारतीचं जाणं हे तिच्या चाहत्यांसाठी खूपच धक्कादायक होते. तिनं आत्महत्या का केली याचे कारण नेहमीच सगळ्यांसाठी गुपित राहिले.
Divya Bharti Death Anniversary
Divya Bharti Death Anniversary esakal

Divya Bharti Death Anniversary : बॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री दिव्या भारतीचं जाणं हे तिच्या चाहत्यांसाठी खूपच धक्कादायक होते. तिनं आत्महत्या का केली याचे कारण नेहमीच सगळ्यांसाठी गुपित राहिले. पोलिसांनी केलेल्या तपासातातून वेगवेगळ्या गोष्टी समोर आल्या. ज्यांनी दिव्याला पाहिले, तिच्यासोबत संवाद साधला त्यांचा अनुभव पूर्ण वेगळा होता. दिव्याचे व्यक्तिमत्व हे कमालीचे प्रभावी होते. असे त्यांचे म्हणणे होते. मात्र तिनं हे करण्यामागील खरे कारण खूपच वेगळे असल्याची चर्चा अजूनही दबक्या आवाजात होतच असते.

वयाच्या 17 व्या वर्षी दिव्यानं बॉलीवूडमध्ये इंट्री केली होती. तिनं विश्वात्मा चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पाऊल ठेवले. त्यानंतर तिच्याकडे वेगवेगळ्या चित्रपटांची ऑफर होती. मात्र त्याच दरम्यान तिनं तिच्या राहत्या घराच्या बाल्कनीतून उडी मारून स्वताला संपविल्याचे दिसून आले. दिव्याची आत्महत्या हे अजूनही गुढ असल्याचे सांगण्यात येते.

Also Read - सामान्यांचा पैसा सुरक्षित ठेवण्यासाठीच Virtual Cureency करकक्षेत

दिव्या जवळ खूप सारे प्रोजेक्टस बाकी होते. तिच्या अकाली मृत्यूनंतर निर्मात्यांना ते प्रोजेक्ट आवरते घ्यावे लागले. काहींनी तो आर्थिक तोटा भरुन काढण्यासाठी दुसऱ्या अभिनेत्रींची तिच्या जागी निवड केली आणि ते चित्रपट प्रदर्शित केले होते. त्यापैकी एक चित्रपट होता लाडला दिव्या सोबत या चित्रपटाचे ९० टक्के शुटिंग पूर्ण करण्यात आले होते. मात्र तिच्या मृत्यूनंतर श्रीदेवीला घेऊन तो चित्रपट पुन्हा शुट करण्यात आला होता.

श्रीदेवीनं तर त्या सेटवरील धक्कादायक अनुभव सांगितले होते. असं म्हटलं जायचं की, श्रीदेवी त्या डायलॉगवर सारखी अडखळत असे ज्यावर दिव्यालाही अनेक रिटेक घ्यावे लागले होते. काही अनुभवानंतर त्या सेटवर धार्मिक विधी करण्यात आल्याची चर्चा आजही चाहते करत असतात.

दिव्या भारतीनं तिचं शिक्षण सोडून फिल्म इंडस्ट्रीमध्ये पाऊल ठेवलं होतं. तिला आपण या इंडस्ट्रीमधील मोठी अभिनेत्री होऊ असं स्वप्न उराशी बाळगलं होतं. वयाच्या अवघ्या सोळाव्या वर्षापासून दिव्यानं बॉलीवूडची वाट धरली. तिच्या काही चित्रपटांना प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले. ऋषी कपूर, शाहरुख खान यांच्यासोबत तिनं काम केलं. गोविंदासोबतही ती झळकली होती. तिच्या अभिनयावर,नृत्यावर सारेजण खुश होते.

दिव्याच्या मृत्यूनंतर तिच्या आईनं तर अनेक धक्कादायक अनुभव सांगितले होते. त्यांचे म्हणणे होते की, दिव्या ही नेहमीच माझ्या स्वप्नात यायची. केवळ दिव्याच्या आईनेच नाहीतर तर ज्यांनी दिव्याच्या मृत्यूची बातमी दिली त्या पत्रकार यांनी देखील या गोष्टीचा उल्लेख केला होता. दिव्या आपल्या स्वप्नात येऊन काही गोष्टी सांगण्याचा प्रयत्न करत असे त्यांनी म्हटले होते.

Divya Bharti Death Anniversary
Priyanka Chopra : 'इतक्या वर्ष गप्प राहिली आता का चुरुचुरु बोलायला लागली?'

वयाच्या अठराव्या वर्षी ती प्रसिद्ध अभिनेत्री झाली. बॉलीवूडमध्ये तिची ओळख वाढली. निर्मांत्यांची रांग तिच्या घराबाहेर होती. १८ व्या वर्षी तिनं प्रसिद्ध निर्माता साजिद नाडियावाला यांच्याशी लग्नंही केलं होतं. असं म्हटलं जातं की, साजिदशी लग्न केल्यानंतर तिनं गुपचूप इस्लामचा स्विकार केला होता. आणि आपलं नाव सना असं ठेवलं होतं.

Divya Bharti Death Anniversary
Bollywood Vs Tollywood : 'का बरं बॉलीवूडवाले टॉलीवूडच्या अभिनेत्यांना चित्रपटात घेऊ लागले'?

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com