Priyanka Chopra : 'इतक्या वर्ष गप्प राहिली आता का चुरुचुरु बोलायला लागली?'

बॉलीवूडमध्ये माझा प्रवास सुरु झाला. तो काही फार सुखावणारा नव्हता. खूप वेगवेगळे अनुभव यावेळी मला आले.
Priyanka Chopra Bollywood actress trolled truth
Priyanka Chopra Bollywood actress trolled truth
Updated on

Priyanka Chopra bollywood actress trolled truth releted : बॉलीवूडमध्ये माझा प्रवास सुरु झाला. तो काही फार सुखावणारा नव्हता. खूप वेगवेगळे अनुभव यावेळी मला आले. काही जणांकडून मोठा अपमानही वाट्याला आला. आपण कुणासोबत वाद न घालता वेगळ्या ठिकाणी नव्या प्रवासाला सुरुवात करावी. असे वाटले. त्यानंतर मोठा निर्णय घेतला. प्रियंकाची ती मुलाखत सध्या लक्ष वेधून घेताना दिसत आहे.

बॉलीवूडमधील वेगवेगळ्या सेलिब्रेटींनी प्रियंकाला सपोर्ट केलं आहे. त्यामध्ये कंगनाचे नाव घेता येईल. तिनं तर तिच्या अंदाजात प्रियंकाची पाठराखण केली आहे. प्रसिद्ध अभिनेता आणि निवेदक शेखर सुमन यांनी देखील मला आणि माझ्या मुलाला बॉलीवूडमधील त्या चार व्यक्तींनी खूप त्रास दिल्याचे म्हटले आहे. त्यांचे ते वक्तव्य व्हायरल झाल्यानंतर बॉलीवूडमध्ये जोरदार प्रतिक्रिया उमटल्याचे दिसून आहे. मात्र यासगळ्यात प्रियंका काही अंशी ट्रोल झाली आहे.

Also Read - शॉर्ट सेलर्स म्हणजे नक्की कोण?

नेटकऱ्यांनी प्रियंकाला तू हॉलीवूडला गेल्यानंतर यासगळ्या गोष्टींविषयी का बोलायला लागली असा प्रश्न केला आहे. जेव्हा तू बॉलीवूडमध्ये होतीस, याठिकाणी सगळे तुझे चांगले चालले असताना तुला चाहत्यांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता. मात्र हॉलीवूडमध्ये निघून गेल्यानंतर तुझ्या वाट्याला फार अन्याय आला असे म्हणणे चुकीचे आहे. अशा आशयाच्या प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी प्रियंकाला दिल्या आहे. कंगनानं तर या साऱ्या परिस्थितीला बॉलीवूडचा करण जोहर जबाबदार असल्याचे म्हटले आहे.

प्रियंकानं भारतात येऊन आता बॉलीवूडविषयी दिलेल्या प्रतिक्रिया नेटकऱ्यांच्या,चाहत्यांच्या चर्चेचा विषय आहे. गेल्या काही दिवसांपासून बॉलीवूडमधील वेगवेगळ्या सेलिब्रेटींनी त्यावर तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली आहे. प्रसिद्ध अभिनेत्री कंगना रनौतनं तर प्रियंकाची बाजू घेतली आहे. बॉलीवूडमध्ये काय घडते हे प्रियंकानं प्रामाणिकपणे सांगितले आहे. बॉलीवूडमध्ये जे माफिया आहेत ते कशाप्रकारे कामगिरी करतात हे बोलण्याचे धाडस तिनं दाखविल्याचे कंगनानं सांगितले होते.

Priyanka Chopra Bollywood actress trolled truth
Jaya Bachchan : 'जयाजी तुम्हाला सांगून ठेवतो...' रवि किशन संतापला!

प्रियंका ही पहिल्यांदाच तिची लेक मालतीसोबत भारतात आली आहे. नीता अंबानी यांच्या एका इव्हेंटमध्ये ती सहभागी झाली होती. त्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले असून त्यावर नेटकऱ्यांनी दिलेल्या प्रतिक्रिया चर्चेत आल्या आहेत. याशिवाय तिची सिटाडेल नावाची वेबसीरिज देखील नेटकऱ्यांच्या चर्चेचा विषय आहे. त्यामध्ये प्रियंका ही महत्वाच्या भूमिकेत आहे. येत्या २८ एप्रिलपासून ही मालिका ओटीटीवर प्रदर्शित होणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

Priyanka Chopra Bollywood actress trolled truth
Aamir Khan-Aishwarya: 'राजा हिंदुस्तानी'मध्ये होणार होता ऐश्वर्या- आमिरचा किस ! 'या' कारणामुळे ऐश्वर्याने दिला नकार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com