Celebrity Diwali : भाभीजी सौम्या टंडनची दिवाळी आहे खास; काय आहे कारण?

अरुण सुर्वे
शनिवार, 26 ऑक्टोबर 2019

भाभीजी घर पर है या लोकप्रिय सीरिअलच्या माध्यमातून सौम्या टंडन घराघरांत पोहोचली. सिरिअलमध्ये अनिताचं कॅरेक्टर करणाऱ्या सोम्याची यंदाची दिवाळी एकदम खास आहे.

भाभीजी घर पर है या लोकप्रिय सीरिअलच्या माध्यमातून सौम्या टंडन घराघरांत पोहोचली. सिरिअलमध्ये अनिताचं कॅरेक्टर करणाऱ्या सोम्याची यंदाची दिवाळी एकदम खास आहे. त्याचं कारणही तसच आहे. फेब्रुवारी महिन्यात सौम्यानं एका मुलाला जन्म दिलाय. तिच्या मुलाचीही पहिलीच दिवाळी असल्यामुळं सौम्या खूपच एक्साईट आहे. त्यातच ती मुंबईत मोठ्या घरात शिफ्ट झालीय. त्यामुळंही ती यंदाच्या दिवाळीसाठी एक्साईट आहे.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

Celebrations on shoot. Wearing this lovely lehanga by @anishashettyofficial #festivedressing #diwalioutfits

A post shared by Saumya Tandon (@saumyas_world_) on

दिवाळी सेलिब्रेशनबाबत सौम्या म्हणाली, ‘मुलासोबत ही माझी पहिलीच दिवाळी आहे. त्यामुळे मी खूपच आनंदित आहे. यंदा माझ्या कुटुंबात अनेक सकारात्मक व चांगल्या गोष्टी घडल्या आहेत. आम्ही नुकतेच मोठ्या घरामध्ये राहायला आलो आहोत. आपण फराळ बनवत, रांगोळी काढत, पणत्या लावत, रोषणाईसह घराची सजावट करत, खेळ खेळत, पार्टी करत हा सण साजरा करू शकतो आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे आपल्या प्रियजनांसोबत उत्साहात दिवाळी साजरी करू शकतो. यंदाही मी लोकांना फटाके न वाजवता उत्साहात या सणाचा आनंद घेण्याचे आवाहन केले आहे.’

दरम्यान, अंगुरी भाभी अर्थात शुभांगी अत्रे दरवर्षी थोड्या हटके पद्धतीने दिवाळी साजरी करते. यंदाही ती अशीच दिवाळी साजरी करणार आहे. ती म्हणाली, ‘दिवाळीत दर वर्षी मी एखाद्या ठिकाणी काहीतरी नवीन दान करते. गेल्या वर्षी मी एका स्वयंसेवी संस्थेमधील मुलांसाठी नवीन कपडे दान केले होते आणि यंदा मी वृद्धाश्रमामध्ये नवीन दिवे व कपडे देणार आहे. मी माझ्या आजी-आजोबांसोबत दिवाळी सण साजरा करताना त्यांच्या चेहऱ्यांवरील आनंद पाहिला आहे. यंदा आम्ही मालिकेच्या सेटवरही खास सेलिब्रेशन करणार आहोत. माझी आई स्पेशल इंदुरी मिठाई आणणार आहे.’


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: diwali festival 2019 shubhangi atre saumya tandon celebration plans