"बिग बींना साथ दिल्याची शिक्षा मला मिळतेय"; गोविंदा इंडस्ट्रीवर नाराज | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

govinda amitabh bachchan

 "मी स्वत: घराणेशाहीचा शिकार झालोय आणि त्याचवेळी मला काम मिळणं बंद झालं."

"बिग बींना साथ दिल्याची शिक्षा मला मिळतेय"; गोविंदा इंडस्ट्रीवर नाराज

अभिनेता गोविंदाने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत बॉलिवूड इंडस्ट्रीबाबत नाराजी व्यक्त केली. त्याचसोबत या मुलाखतीत तो विविध मुद्द्यांवर व्यक्त झाला. भाचा आणि कॉमेडियन कृष्णा अभिषेकसोबत असलेल्या वादावरही त्याने भाष्य केलं.  "मी स्वत: घराणेशाहीचा शिकार झालोय आणि त्याचवेळी मला काम मिळणं बंद झालं. मी अमिताभ बच्चन यांनासुद्धा संघर्ष करताना पाहिलोय. ते स्टेजवर यायचे आणि इंडस्ट्रीतील लोक दूर निघून जायचे. मला कळत नाहीये की, त्यांना साथ दिल्याची शिक्षा मला मिळतेय का? त्यांनी बिग बींना सोडलं आणि माझ्यामागे लागले", असा आरोप गोविंदाने केला. गोविंदा आणि भाचा कृष्णा अभिषेक यांच्यातील वादसुद्धा जगजाहीर आहे. गोविंदाने जेव्हा 'द कपिल शर्मा शो'मध्ये हजेरी लावली होती, त्यावेळी कृष्णा त्या शोमध्ये मुद्दाम गैरहजर राहिला होता. 

याविषयी गोविंदा 'टाइम्स ऑफ इंडिया'ला दिलेल्या मुलाखतीत म्हणाला, "त्याला असं कोण वागायला सांगतंय काय माहित? पण तो चांगला मुलगा आहे. असं करून तो केवळ स्वत:ची मस्करी उडवत नाहीये तर माझीसुद्धा प्रतिमा मलीन करतोय." गोविंदा आणि कृष्णा यांच्यामध्ये गेल्या अनेक वर्षांपासून मतभेद सुरू आहेत. हे मतभेद आता इतक्या टोकाला गेले आहेत की हे दोघं एकमेकांसमोर येणंसुद्धा टाळतात. 

हेही वाचा : "इंडस्ट्रीत आपले पण परके होतात"; १६ कोटी रुपये गमावल्याचा गोविंदाचा आरोप 

दोघांमध्ये नेमका काय वाद आहे?
२०१५ साली कृष्णाने एक मुलाखतीत सांगितलं होतं, "बॉलिवूडमध्ये येण्यासाठी माझ्या मामाने माझी कोणतीच मदत केली नाही. मी स्वत: संघर्ष करून माझं अस्तित्व सिद्ध केलंय." यावर चिडलेल्या गोविंदाने दुसऱ्या मुलाखतीत म्हटलं, "केलेले उपकार लोक लवकर विसरून जातात." या दोघांमधील वाद कृष्णाची पत्नी कश्मीरामुळे आणखी वाढला. २०१८ मध्ये गोविंदाने एका शोच्या निर्मात्यावर पैसे न दिल्याचा आरोप केला होता. त्यावर कश्मीराने ट्विट करत लिहिलं, 'लोक पैशांसाठी कुठेही नाचतात'. हे ट्विट सोशल मीडियावर खूप चर्चेत आलं होतं. तेव्हापासून गोविंदा आणि कृष्णा यांच्यात आणखी कटूता निर्माण झाली. 

Web Title: Do Not Know If I Got Punished Supporting Amitabh Bachchan Says Govinda His

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..