"सलमानचा सिनेमा पाहायला गेले अन् कोरोना झाला असं त्यांनी म्हणायला नको"

'भाईजान'ची चाहत्यांना विनंती
Salman Khan
Salman Khan

बॉलिवूडचा 'भाईजान' अर्थात अभिनेता सलमान खानचा Salman Khan बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित चित्रपट 'राधे : युअर मोस्ट वाँटेड भाई' Radhe : Your Most Wanted Bhai ईदच्या मुहूर्तावर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाच्या प्रदर्शनासाठी सलमानने एक वेगळीच युक्ती लढवली आहे. एकीकडे चित्रपटगृहांमध्ये तर दुसरीकडे 'पे पर व्ह्यू' प्लॅटफॉर्म झीप्लेक्सवर Zeeplex 'राधे' प्रदर्शित होणार आहे. कोरोनाची दुसरी लाट असल्याने बॉक्स ऑफिस कलेक्शन मात्र कमीच असणार हे सलमानने मान्य केलं. मात्र त्याचसोबत त्याने चाहत्यांना एक विनंतीसुद्धा केली आहे. "काही चाहत्यांनी सिनेमा हॉल्स बुक केले आहेत. मी त्यांना विनंती करतो की असं काही करू नका. सलमानचा चित्रपट पाहायला गेले आणि कोरोना झाला हे मला लोकांकडून ऐकायचं नाहीये", असं तो म्हणाला. (Do not want people to say that they got Corona when they went to watch Salman Khan film)

'राधे'च्या प्रमोशननिमित्त सलमानने मुलाखत दिली. या मुलाखतीत त्याने चित्रपटाच्या प्रदर्शनाविषयीच्या प्रश्नांची उत्तरं दिली. त्याचसोबत त्याने चित्रपटगृह मालकांची माफी मागितली. "या चित्रपटाच्या प्रदर्शनामुळे नफा कमावण्याची अपेक्षा करणाऱ्या थिएटर्स मालकांची मी माफी मागतो. आम्ही खूप प्रतीक्षा केली की कोरोनाचं संकट दूर व्हावं आणि थिएटरमध्ये हा चित्रपट प्रदर्शित करण्यात यावा. पण तसं शक्य होऊ शकलं नाही. गोष्टी पूर्ववत कधी होणार तेसुद्धा आपल्याला माहित नाही", अशा शब्दांत त्याने खंत व्यक्त केली.

हेही वाचा : 'लसीकरणासाठी VIP असल्याचा फायदा घेतला' म्हणणाऱ्याला फरहानचं सडेतोड उत्तर

दरवर्षी ईदच्या मुहूर्तावर प्रदर्शित होणाऱ्या सलमानच्या चित्रपटाची कमाई किती होणारी, याकडे सर्वांचं लक्ष असतं. मात्र यंदा ही कमाई शून्य असेल, असं तो स्वत: म्हणाला. "राधेचं बॉक्स ऑफिस कलेक्शन शून्य असेल. सलमान खानच्या चित्रपटाची ही सर्वांत कमी कमाई असेल. भारतातील ठराविक चित्रपटगृहांमध्येच हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे", असं सलमानने सांगितलं.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com