'लसीकरणासाठी VIP असल्याचा फायदा घेतला' म्हणणाऱ्याला फरहानचं सडेतोड उत्तर

महापालिकेच्या 'ड्राइव्ह इन लसीकरण' सुविधेअंतर्गत फरहानने घेतली लस
bollywood actor farhan akhtar
bollywood actor farhan akhtar Team esakal

अभिनेता फरहान अख्तरने Farhan Akhtar 'ड्राइव्ह इन लसीकरण' Drive in vaccination सुविधेअंतर्गत कोरोना प्रतिबंधक लशीचा डोस घेतला आणि त्याचा फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला. मात्र याच कारणामुळे नेटकऱ्यांनी त्याला ट्रोल केलंय. 'ड्राइव्ह इन लसीकरण सुविधा' ही ज्येष्ठ नागरिक किंवा दिव्यांगांसाठी असून फरहानने 'व्हिआयपी' असल्याचा फायदा घेतला, अशी टीका त्याच्यावर होत आहे. त्यावर फरहानने संबंधित नेटकऱ्याला प्रत्युत्तर दिलं आहे. (Farhan Akhtar shuts down troller calling him VIP brat for using drive in vaccination facility)

'६० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांसाठी असलेल्या ड्राइव्ह इन लसीकरण सुविधेत फरहानने लस घेतली. एकतर त्याचं वय ६० वर्षांहून अधिक असेल किंवा मग तो दिव्यांग असेल ज्याबाबत आपल्याला माहित नाही किंवा लसीकरणासाठी त्याने त्याच्या स्टेटसचा वापर केला असेल', असं ट्विट नेटकऱ्याने केलं. त्याला उत्तर देत फरहान म्हणाला, 'ड्राइव्ह इन लसीकरणाची सुविधा ही ४५ हून अधिक वयोगटासाठी उपलब्ध आहे. त्यामुळे आता मिळालेल्या वेळेत तुम्ही समाजासाठी काहीतरी चांगलं काम करा.'

हेही वाचा : बहिणी अर्पिता, अलविरा होते कोव्हिड पॉझिटिव्ह- सलमान खान

मुंबई महानगरपालिकेने काही दिवसांपूर्वी पहिली ड्राइव्ह इन लसीकरण सुविधा सुरू केली. याअंतर्गत ८ मे रोजी फरहानने लशीचा पहिला डोस घेतला आणि त्याचा फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com