पत्रलेखाच्या मंगळसूत्राने वेधलं नेटकऱ्यांचं लक्ष; जाणून घ्या किंमत.. | Patralekha | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

patralekha and rajkumar

पत्रलेखाच्या मंगळसूत्राने वेधलं नेटकऱ्यांचं लक्ष; जाणून घ्या किंमत..

sakal_logo
By
टीम ई सकाळ

बॉलिवूड अभिनेता राजकुमार राव Rajkummar Rao आणि पत्रलेखा Patrakekha हे नुकतेचं लग्नबंधनात अडकले. सुमारे ११ वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर, त्या दोघांनी १५ नोव्हेंबर रोजी चंदीगडमधील ओबेरॉय सुख विलास लक्झरी रिसॉर्टच्या कोहिनूर व्हिलामध्ये लग्नगाठ बांधली. जवळचे नातेवाईक आणि मित्रांच्या उपस्थितीत त्यांचं लग्न पार पडलं. लग्नानंतर पहिल्यांदाच या दाम्पत्याला विमानतळावर एकत्र पाहिलं गेलं. यावेळी सर्वांच्या नजरा या नवविवाहित जोडप्यावर खिळल्या होत्या. एअरपोर्टवर पापाराझींनी या दोघांचे फोटो काढले आणि या फोटोमधील पत्रलेखाच्या मंगळसूत्राने नेटकऱ्यांचं लक्ष वेधलं.

सेलिब्रिटी फोटोग्राफर विरेंद्र चावलाने त्या दोघांचा फोटो पोस्ट केला आहे. विमानतळावर नववधूच्या लूकमध्ये पत्रलेखा खूपच सुंदर दिसत होती. यावेळी पत्रलेखाने लाल रंगाची साडी नेसली आहे. तर राजकुमारने पांढऱ्या रंगाचा कुर्ता परिधान केला आहे. पण, या सगळ्यामध्ये चाहत्यांचं लक्ष हे पत्रलेखाच्या मंगळसुत्रावर खिळलं होतं. पत्रलेखाचं हे मंगळसूत्र सेलिब्रिटी फॅशन आणि ज्वेलरी डिझायनर सब्यसाचीने डिझाइन केलं आहे. हे मंगळसूत्र १८ कॅरेटचं असून त्यात सोनेरी मोत्यांचा वापर केला आहे. या मंगळसूत्राची किंमत जवळपास १ लाख ६५ हजार रुपये असल्याचं समजतंय.

हेही वाचा: TRP यादीत 'ही' मालिका अग्रस्थानी; 'आई कुठे काय करते'ला टाकलं मागे

हेही वाचा: राजकुमार-पत्रलेखाच्या लग्नाचा अल्बम

राजकुमार आणि पत्रलेखाने त्यांच्या सोशल मीडियावर त्यांच्या लग्नाचे काही फोटो पोस्ट केले आहेत. त्यांच्या लग्नात काही बॉलिवूड सेलिब्रिटींनीदेखील हजेरी लावली होती. नुकतंच राजकुमारचा क्रिती सनॉनसोबतचा 'हम दो हमारे दो' हा चित्रपट रिलीज झाला होता. आता राजकुमार लवकरच अनुभव सिन्हा यांच्या 'भिड' चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात करणार आहे.

loading image
go to top