ट्रम्प यांनी केलं आयुषमानच्या 'शुभमंगल'चं कौतुक, म्हणाले...

वृत्तसंस्था
शनिवार, 22 फेब्रुवारी 2020

समलैंगिक संबंधाची कॉमेडी लव्हस्टोरी जाखविणारा हा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस तर पडलाच, पण बड्या राजकीय व्यक्तिनेही आयुषमानच्या 'शुभमंगल'चे कौतुक केले आहे.

आयुषमान खुराना नेहमीच वेगळ्या आणि हटके विषयांवरील चित्रपटात काम करतो. सध्या त्याचा 'शुभमंगल ज्यादा सावधान' सध्या बॉक्स ऑफिसवर चांगलीच धूम करत आहे. समलैंगिक संबंधाची कॉमेडी लव्हस्टोरी जाखविणारा हा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस तर पडलाच, पण बड्या राजकीय व्यक्तिनेही आयुषमानच्या 'शुभमंगल'चे कौतुक केले आहे.  

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

अमेरिकेचे अध्यक्ष भारत दौऱ्यावर असल्याने त्यांच्या स्वागताची जोरदार तयारी सुरू आहे. त्यामुळे भारतात त्यांचीच चर्चा सुरू आहे. मात्र, आता ते पुन्हा एकदा चर्चेत आलेत ते म्हणजे ट्रम्प यांनी भारतीय चित्रपट 'शुभमंगल ज्यादा सावधान'ची स्तुती केली आहे. अमेरिकन मानवाधिकार संरक्षक कार्यकर्ते पीटर टॅचल यांनी 'शुभमंगल ज्यादा सावधान' या चित्रपटाच्या समलैंगिक संबंध या संकल्पनेचे कौतुक केले आहे. 'भारतात समलैंगिक संबंधांना कायदेशीररित्या मान्यता मिळाली आहे. मात्र, समाजाने हा विषय मान्य करण्यासाठी असे प्रबोधनपर चित्रपट येणे गरजेचे आहे. या चित्रपटात समलैंगिक जोडप्याची गोष्ट दाखविण्यात आली आहे.' या ट्विटला रिट्विट करत ट्रम्प यांनी 'ग्रेट' असे ट्विट केले आहे.  त्यामुळे ट्रम्प पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत.

करिनाने सोडलं शाहीदसोबतच्या रिलेशनशिपबद्दल मौन

ट्रम्प यांनी भारतीय चित्रपट शुभमंगल ज्यादा सावधान चित्रपटाची स्तुती केल्याने हे ट्विट व्हायरल झाले आहेत. एनेकांनी कमेंट करत आयुषमानचेही कौतुक केले आहे. 

ट्रम्प यांचा २४ फेब्रुवारीला भारत दौरा आहे. त्यांच्यासाठी 'नमस्ते ट्रम्प' या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच ट्रम्प अहमदाबादमधील मोंटेरा स्टेडियमचे उद्धाटन करणार आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Donald Trump praises Ayushman Khurana s Shubhmangal Zyada Saavdhan