Dr. Amol Kolhe: महाराष्ट्रातील 5 शहरांत रंगणार 'शिवप्रताप गरुडझेप'चा प्रिमियर सोहळा

विजयादशमीच्या मुहुर्तावर ५ ऑक्टोबरला डॉ.अमोल कोल्हे यांचा बहुचर्चित ‘शिवप्रताप–गरुडझेप’ प्रदर्शित होत आहे.
Dr. Amol Kolhe, Shivpratap Garud Jhep Marathi Movie-premier in maaharashtra's 5 cities
Dr. Amol Kolhe, Shivpratap Garud Jhep Marathi Movie-premier in maaharashtra's 5 citiesGoogle
Updated on

Dr. Amol Kolhe Movie: ‘शिवप्रताप–गरुडझेप’ हा डॉ.अमोल कोल्हे यांचा बहुचर्चित चित्रपट प्रदर्शनाच्या वाटेवर आहे. विजयादशमीच्या मुहुर्तावर ५ ऑक्टोबरला ‘शिवप्रताप–गरुडझेप’ प्रदर्शित होत आहे. इतिहासाच्या पानांमध्ये अभिमानाने कोरलेला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ऐतिहासिक आग्रा सुटकेचा थरार दाखवणाऱ्या या चित्रपटाची सध्या सर्वत्र चर्चा सुरू आहे. विशेष म्हणजे प्रदर्शनाआधी या चित्रपटाचे ५ शहरांत विशेष शो आयोजित करण्यात आले आहेत. या चित्रपटाच्या भव्यतेप्रमाणेच प्रिमियरची भव्य तयारी करण्यात आलेली आहे. मुंबई, पुणे, नाशिक, कोल्हापूर, बेळगाव या पाच महत्त्वाच्या शहरात हे प्रिमियर संपन्न होणार आहेत.(Dr. Amol Kolhe, Shivpratap Garud Jhep Marathi Movie-premier in maaharashtra's 5 city)

Dr. Amol Kolhe, Shivpratap Garud Jhep Marathi Movie-premier in maaharashtra's 5 cities
'कुशलनं जबरदस्ती केली अन्..',काय म्हणायचंय श्रेयाला?

शनिवार १ ऑक्टोबरला नाशिकच्या सिटी सेंटरला सायं ७.०० वा., रविवार २ ऑक्टोबरला सिटीप्राइड कोथरुड, पुणे सायं ७.०० वा., सोमवार ३ ऑक्टोबरला कोल्हापूर आयनॉक्स सायं ७.०० वा., मंगळवार ४ ऑक्टोबरला बेळगाव आयनॉक्स सायं ७.०० वा. तर दसऱ्याला ५ ऑक्टोबरला मुंबईत अंधेरी इन्फिनिटी रात्रौ ८.०० वा. हे दिमाखदार प्रिमियर रंगणार आहे. चित्रपटातील कलाकारांच्या टीमसोबत विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती या खास शो साठी राहणार आहे.

Dr. Amol Kolhe, Shivpratap Garud Jhep Marathi Movie-premier in maaharashtra's 5 cities
चित्रांगदा मालामाल, चाहता कंगाल

‘आग्र्याहून सुटका’ हा शिवचरित्रातील हा महत्त्वाचा अध्याय ‘शिवप्रताप–गरुडझेप’ या चित्रपटातून उलगडणार आहे. या चित्रपटात डॉ. अमोल कोल्हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत असून त्यांच्यासोबत यतीन कार्येकर, प्रतीक्षा लोणकर, हरक अमोल भारतीय, शैलेश दातार, हरीश दुधाडे, मनवा नाईक, पल्लवी वैद्य, अजय तपकिरे, रमेश रोकडे, अलका बडोला कौशल, आदी ईराणी, विश्वजीत फडते आदी कलाकारांच्या भूमिका आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन कार्तिक राजाराम केंढे यांनी केले आहे.

Dr. Amol Kolhe, Shivpratap Garud Jhep Marathi Movie-premier in maaharashtra's 5 cities
शाहिदचं 58 करोडचं नवं घर...एकदम जन्नत...

डॉ.अमोल कोल्हे, विलास सावंत, सोनाली घनश्याम राव, चंद्रशेखर ढवळीकर, कार्तिक राजाराम केंढे यांनी या चित्रपटाची निर्मिती केली असून प्रफुल्ल तावरे सहनिर्माते आहेत. रविंद्र मानकामे कार्यकारी निर्माते आहेत. छायाचित्रण संजय जाधव यांचे असून संकलन पीटर गुंड्रा यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com