भीमराव-रमाबाईंचा आज विवाह सोहळा

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 14 ऑगस्ट 2019

या मालिकेतील 75 एपिसोड्स आज पूर्ण होत आहेत. डोळ्यांतून पाणी काढणारा या महामानवाचा प्रवास ज्या कमाल रीतीने सर्वसामान्यांसमोर येतोय तो अविश्वसनीय आणि कौतुकास पात्र आहे. आंबेडकर यांच्या भूमिकेत असलेल्या कलाकारांच्या भूमिकेचे कौतुक करण्यात येत आहे. 

मुंबई : डॉ. बाबासाहेब आंबेडकर: महामानवाची गौरवगाथा या मालिकेतून डोळ्यांतून पाणी काढणारा या महामानवाचा प्रवास सर्वसामान्यांसमोर येत असून, त्यात आज मोठी घडामोड घडणार आहे. भीमराव आणि रमाबाई यांच्या विवाहाचा भाग आज (बुधवार) प्रसारित होणार आहे.

या मालिकेतील 75 एपिसोड्स आज पूर्ण होत आहेत. या महामानवाचा प्रवास ज्या कमाल रीतीने सर्वसामान्यांसमोर येतोय तो अविश्वसनीय आणि कौतुकास पात्र आहे. आंबेडकर यांच्या भूमिकेत असलेल्या कलाकारांच्या भूमिकेचे कौतुक करण्यात येत आहे. 

स्टार प्रवाह या वाहिनीवर या मालिकेचे प्रसारण करण्यात येते. भीमराव आणि रमाबाई यांच्या विवाहानिमित्त खास पत्रिका बनविण्यात आली असून, ती सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये सर्व माहिती देण्यात आली आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Dr Babasaheb Ambedkar tv serial marriage ceremony