'इथला धीर पुरेनासा होतो'; आईच्या निधनानंतर गिरीश ओक भावूक

girish oak
girish oak

'अग्गंबाई सासूबाई'नंतर आता 'अग्गंबाई सूनबाई' या मालिकेच्या नव्या पर्वात अभिजीत राजेंची भूमिका साकारणारे अभिनेते डॉ. गिरीश ओक यांना मातृशोक झाला. २१ मार्च रोजी शशिकला ओक यांनी अखेरचा श्वास घेतला. आईच्या निधनानंतर गिरीश ओक यांनी फेसबुकवर पोस्ट लिहित त्यांच्या भावनांना वाट मोकळी करून दिली. 'माझी आई, जन्म २२ सप्टेंबर १९३७, परवाच २१ मार्च २०२१ रोजी मला आत्मनिर्भर करून गेली आणि कधीतरी कोणाचं तरी सांत्वन करण्यासाठी मीच केलेली ही कविता माझंच सांत्वन करायला धावून आली आणि माझ्यात सकारात्मकता भरून गेली,' असं त्यांनी या पोस्टच्या सुरुवातीला लिहिलं. 

गिरीश ओक यांनी लिहिलेली कविता- 
"इथला धीर पुरेनासा होतो
इथलं औषध लागेनासं होतं
इथली हवा मानवेनाशी होते
मग जगण्याची इच्छाच नाहीशी होते
बट डोन्ट से द पेशंट ईझ डेड
बट द पेशंट ईझ ट्रान्सफर्ड टू सूपर आय सी यू
तिथला धीर खोटा खोटा नसतो
अमृत फार्मास्युटिकल्सच्या औषधांमधे भेसळ नसते
अहो क्वॅालिटी कंट्रोल बोर्डावर चक्क अश्विनी कुमार बसलेले असतात नं!
आणि हवं नको ते बघायला मुलं नातवंडं नाही तर चक्क आई बाबा आजी आजोबा खापर खापर सगळेच
तिथल्या हवेत पोल्यूशन नसतं
सगळंच कसं इथल्यापेक्षा अपग्रेडेड असतं
तिथे जगण्यासाठी शरीराची गरजच नसते
मग ते थकलं काय नी नसलं काय
फक्त इथल्या आयसीयूच्या दाराच्या काचेतून तुम्ही पेशंटला बघू शकतात हेल्पलेसपणे
ती सोय (?) सूपर आयसीयूला नाही
पण काळजी करू नका
केस आता खुद्द डॅाक्टर धन्वंतरींच्या हातात आहे
सो डोन्ट वरी "

"आई तू आमच्यासमोर नसणार आहेस पण आमच्या पाठीशी असणार आहेस माहितीये आम्हाला," अशा शब्दांनी त्यांनी या पोस्टचा शेवट केला. पडद्यावर अभिजीत राजे साकारणारे खऱ्या आयुष्यातही किती हळवे आणि संवेदनशील आहेत याचा प्रत्यय चाहत्यांना या कवितेच्या निमित्ताने आला. 

मुंबई मनोरंजन

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com