Dream Girl 2 box office collection day 1: पूजाला भेटण्यासाठी प्रेक्षकांची तुफान गर्दी! पहिल्या दिवशी जमवला इतक्या कोटींचा गल्ला..

Dream Girl 2 box office collection: राज शांडिल्य दिग्दर्शित 'ड्रीम गर्ल 2' हा चित्रपट या शुक्रवारी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला.
Dream Girl 2 T  Ayushmann Khurrana's Film

Dream Girl 2 box office collection day 1
Dream Girl 2 T Ayushmann Khurrana's Film Dream Girl 2 box office collection day 1 Esakal

Dream Girl 2 box office collection day 1: गेल्या दोन आठवड्यांपासून बॉक्स ऑफिसवर दोन बॉलिवूड सिनेमांनी तुफान कमाई केली. 'गदर 2' आणि 'OMG 2'. या दोन्ही सिनेमांनी अनेक रेकॉर्ड तयार केले. आता त्यातच आणखी एका चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर एंट्री केली. राज शांडिल्य दिग्दर्शित 'ड्रीम गर्ल 2' हा चित्रपट या शुक्रवारी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला.

Dream Girl 2 T  Ayushmann Khurrana's Film

Dream Girl 2 box office collection day 1
Khatron Ke Khiladi Season 13: 'खतरों के खिलाडी 13' मध्ये कुत्र्याचा हल्लाने अभिनेत्री जखमी!

4 वर्षापुर्वी 'ड्रीम गर्ल' चा पहिला भाग रिलिज झाला होता. त्याचा सिक्वेल म्हणजेच 'ड्रीम गर्ल 2' . पहिला भाग हिट असल्यामुळे या चित्रपटाच्या दुसऱ्या भागाकडून प्रेक्षकांना खुपच अपेक्षा होत्या. त्यामुळे आता 'ड्रीम गर्ल 2' ला देखील प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळेल असं काहीस चित्र सध्या दिसत आहे. आता 'ड्रीम गर्ल 2' च्या पहिल्या दिवसाच्या कमाईचे आकडे समोर आले आहेत.

Dream Girl 2 T  Ayushmann Khurrana's Film

Dream Girl 2 box office collection day 1
Vijay Devarkonda : 'आईला नातू हवाय, पण....!' लग्नावर विजय देवरकोंडानं दिलेली प्रतिक्रिया चर्चेत

SacNilk च्या सुरुवातीच्या ट्रेंड रिपोर्टनुसार, 'ड्रीम गर्ल 2' ने रिलीजच्या पहिल्या दिवशी शुक्रवारी बॉक्स ऑफिसवर 9.7 कोटी रुपयांची कमाई केली आहे. 'गदर 2' आणि 'OMG 2' या चित्रपटाच्या कलेक्शन समोर हे आकडे समाधान कारक आहेत.

त्याचबरोबर वीकेंडला 'ड्रीम गर्ल 2' ची कमाई वाढेल आणि तो एक उत्तम कलेक्शन करेल अशी अपेक्षा आहे. आता 'ड्रीम गर्ल 2' किती कोटींपर्यंतचा गल्ला जमवू शकतो हे पहाणे उत्सूकतेचे ठरेल.

चित्रपटाच्या कालाकारांबद्दल बोलायचं झालं तर सिनेमात आयुष्मान खुराना आणि अनन्या पांडे यांच्याशिवाय परेश रावल, अनु कपूर, राजपाल यादव, असरानी, ​​सीमा पाहवा, विजय राज, मनजोत सिंग, अभिषेक बॅनर्जी, रंजन राज, मनोज जोशी यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका या चित्रपटात आहेत. यात आयुष्मान पुजाच्या भुमिकेत प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे.

Dream Girl 2 T  Ayushmann Khurrana's Film

Dream Girl 2 box office collection day 1
Vijay Varma Reaction : 'आम्ही प्रेम केलं, तुमचं काय गेलं?' तमन्नासोबतच्या प्रेमावरील कमेंट्सनं विजय वैतागला!

आयुष्मानचा हा चित्रपट 2019 च्या हिट चित्रपट 'ड्रीम गर्ल'चा सिक्वेल आहे. ड्रीम गर्ल 28 कोटींच्या बजेटमध्ये तयार करण्यात आला होता त्याने 200 कोटींची कमाई केली होती. त्याचबरोबर 'ड्रीम गर्ल 2'ची ओपनिंगही चांगली झाली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com