Ayushmann Khurrana: 'आज बाबा असायला हवे होते', ड्रीम गर्ल 2 चं यश पाहून आयुष्मान खुरानाला आली वडीलांची आठवण

ड्रीम गर्ल 2 चं यश पाहून आयुष्मानला बाबांची आठवण येऊन त्याने भावुक शब्दात भावना व्यक्त केल्यात
dream girl 2 success ayushmann khurrana emotional about her father and remember him
dream girl 2 success ayushmann khurrana emotional about her father and remember him SAKAL

बॉलीवुड अभिनेता आयुष्मान खुरानाचा ड्रीम गर्ल 2 सिनेमा २५ ऑगस्टला रिलीज झाला. ड्रीम गर्ल 2 ला बॉक्स ऑफीसवर चांगलं यश मिळातंय. हे यश पाहून आयुष्मान खुरानाला त्याच्या बाबांची आठवण आलीय.

आयुष्मानच्या बाबांचं काहीच दिवसांपुर्वी निधन झालं. बाबांच्या अकस्मात निधनाने आयुष्मानच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. आज ड्रीम गर्ल 2 चं यश पाहून आयुष्मानला बाबांची आठवण आलीय.

(dream girl 2 success ayushmann khurrana)

dream girl 2 success ayushmann khurrana emotional about her father and remember him
Akshaya Deodhar: लग्नानंतरच्या पहिल्या मंगळागौरीत अक्षया देवधरची मेहंदी सजली, व्हिडीओ व्हायरल

माझ्या बाबांनी ड्रीम गर्ल 2 ला मिळणारं यश पाहिलं असतं तर...

बॉलीवुड अभिनेता आयुष्मान खुराना ह्याने ड्रीम गर्ल २ द्वारे आपल्या करियर ची सर्वात बेस्ट ओपनिंग घेतली असून , तीन दिवसांत तब्बल ४०.७१ करोड़ ची भरघोस कमाई केली आहे. आयुष्मान त्याच्या आयुष्यातील या खास क्षणी त्याचे वडील पी. खुराना ह्यांना मिस करत असून आणि त्याच्या वडिलांनी ड्रीम गर्ल 2 पहावी अशी इच्छा आहे!

आयुष्मान ड्रीम गर्ल 2 च्या यशोगाथेबद्दल बोलण्यासाठी संपर्क साधला असता, स्टार म्हणतो, “माझ्या वडिलांनी हे अनुभवायला हवे होते. ड्रीम गर्ल हा त्यांचा आवडता चित्रपट होता. मी काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न कसा केला याचा त्यांना खूप अभिमान होता. मला आठवतंय तो चित्रपट पाहताना त्यांना हसू अनावर झाले होते. हा चित्रपट धडाकेबाज यश मिळवेल असा अंदाज त्यांनी व्यक्त केला होता. माझी इच्छा आहे की त्यांनी ड्रीम गर्ल 2 देखील बघायला हवा होता .

माझे बाबा सर्वात मोठे चिअरलीडर

आयुष्मान पुढे म्हणतो, “मला माहित आहे की त्यांना ते आवडले असते आणि त्यांना पुन्हा मनापासून हसताना मला आवडले असते. ते माझे सर्वात मोठे समर्थक होते. त्यांचा माझ्यावरील अतुलनीय विश्वासाने मला आज मी जो आहे असे बनवले आहे.”

आयुष्मान म्हणतो की त्याचे वडील त्याचे सर्वात मोठे चीअर-लीडर होते आणि त्यांनी त्याला चांगला मनुष्य बनण्यास प्रवृत्त केले. तो म्हणतो, “मीच माझे नशिब घडवू शकतो आणि मी नेहमी माझे मन जे सांगते ते केले पाहिजे. मला माहीत आहे की ते मला वरून आशीर्वाद देत असतील. त्यांचे प्रगल्भ शब्द माझ्या मनात नेहमी ऐकू येत राहतील ‘बेटा पब्लिक की नब्ज समझो’.”

ड्रीम गर्ल 2 ची बॉक्स ऑफीसवर बक्कळ कमाई

बॉक्स ऑफिसवर 'ड्रीम गर्ल 2'चे एकूण कलेक्शन वीकेंडलाच 40 कोटींवर गेले आहे. तर चित्रपटाने आतापर्यंत जगभरात 34 कोटींची कमाई केली आहे. केवळ 35 कोटींच्या बजेटमध्ये तयार करण्यात आलेल्या या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर कमाल केली आहे.

राज शांडिल्य दिग्दर्शित हा चित्रपट 2019 मध्ये रिलीज झालेल्या 'ड्रीम गर्ल 2' चा सिक्वेल आहे. ड्रीम गर्ल 2 मध्ये आयुष्मान-अनन्या व्यतिरिक्त, परेश रावल, अनु कपूर, विजय राज, राजपाल यादव आणि अभिषेक बॅनर्जी हे कलाकार मनोरंजन करत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com