रितेश देशमुख म्हणतोय 'ढगाला लागली कळं...'

वृत्तसंस्था
Tuesday, 27 August 2019

मुंबई : आयुषमान खुरानाचा आगामी चित्रपट 'ड्रिम गर्ल' इंटरनेवर चाहत्यांची मने जिंकत आहे. त्याचमागोमाग याच चित्रपटामधील 'दिल का टेलिफोन' आणि 'राधे राधे' ही गाणीही नेटकऱ्यांनी डोक्यावर घेतली आहेत. गणपती उत्सवाच्या निमित्ताने प्रेक्षकांना आणखी एका दमदार गाण्य़ाची ट्रिट मिळणार आहे.

मुंबई : आयुषमान खुरानाचा आगामी चित्रपट 'ड्रिम गर्ल' इंटरनेवर चाहत्यांची मने जिंकत आहे. त्याचमागोमाग याच चित्रपटामधील 'दिल का टेलिफोन' आणि 'राधे राधे' ही गाणीही नेटकऱ्यांनी डोक्यावर घेतली आहेत. गणपती उत्सवाच्या निमित्ताने प्रेक्षकांना आणखी एका दमदार गाण्य़ाची ट्रिट मिळणार आहे.

सुप्रसिद्ध अभिनेते दादा कोंडके याचं 'ढगाला लागली कळं' हे मुळ गाणं असून त्याचा जबरदस्त रिमेक करण्यात आला आहे. 'ढगाला लागली कळं' हे गाणं पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत असलेल्या रितेश देशमुखवर चित्रित झालं आहे. मुख्य कलाकारांच्या भूमिकेत असलेले आयुषमान खुराना आणि नुसरत भरुचा देखील या गाण्यात ताल धरताना दिसत आहेत. या त्रिकुटाने गाण्याचा चांगलाच आनंद घेतला. त्यामुळे तुम्हालाही या गाण्यावर ठेका धरल्याशिवाय राहता येणार नाही. हे गाणं यावर्षीचं फेस्टिव सॉंग ठरणार आहे यात काहीच शंका नाही. 

"प्रत्येक हिंदी सिनेमांच्या प्रमोशनसाठी पंजाबी गाणचं वापरलं जातंय, मग यावेळी मराठीत होऊन जाऊदे का?" अशा अनोख्या अंदाजात रितेशने गाण्याची सुरुवात केली आहे. तर मराठीत "का नाही भाऊ" असा प्रतिसाद आयुषमान देताना दिसतोय. 

मीत ब्रदर्संनी हे गाणं निर्मित केलं आहे. तर, मीत ब्रोस, मिका सिंग आणि ज्योतिका तंगरी यांनी आवाज दिला आहे. मूळ गाणं मराठीत असल्याने अभिनेत्री नुसरतसुद्धा मराठमोळ्या अंदाजात दिसली आहे. यासंदर्भात अधिक माहिती देताना ती म्हणाली की, तिला या गाण्यामध्ये पूर्णपणे मराठी लुक हवा होता. त्याचसोबत तिला माधुरी सारखं ही दिसायचं होतं असंही सांगितलं. शोभा कपूर आणि एक्ता कपूर यांनी निर्मिती केलेला हा सिनेमा 13 सप्टेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Dream Girl s new song guest appearance of rietesh deshmukh