Drishyam 2: उरले फक्त ४८ तास! 'या' भन्नाट ऑफरसह सिनेमाचं तिकीट आत्ताच बूक करा... Ajay Devgan | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Drishyam 2 advance booking makers slash ticket prices for two days as diwali

Drishyam 2: उरले फक्त ४८ तास! 'या' भन्नाट ऑफरसह सिनेमाचं तिकीट आत्ताच बूक करा...

Drishyam2: अजय देवगणच्या 'दृश्य २' सिनेमाची अॅडव्हान्स बुकिंग सुरु करण्यात आलेली आहे. दिवाळीच्या निमित्तानं निर्मात्यांनी आता एक खास ऑफर दिली आहे,ज्या अंतर्गत या दिवाळीच्या दोन दिवसांत प्रेक्षकांना तिकिटांवर २५ % डिस्काऊंट मिळणार आहे. जे लोक २४ आणि २५ ऑक्टोबर रोजी दृश्यम सिनेमाची तिकीट बूक करतील त्यांनाच या ऑफरचा लाभ घेता येईल.(Drishyam 2 advance booking makers slash ticket prices for two days as diwali)

हेही वाचा: Prabhas: प्रभासच्या चाहत्यांनी प्रेमापोटी थिएटरलाच लावली आग; आंध्रप्रदेशमधील घटना

२ आणि ३ ऑक्टोबरला देखील निर्मात्यांनी एक ऑफर आणली होती,ज्याला लोकांचा उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला. म्हणून आता आणखी एक ऑफर मेकर्सनी आणली आहे. अजय देवगणचा सिनेमा 'दृश्यम २' १८ नोव्हेंबर रोजी रिलीज होणार आहे. भुषण कुमार प्रॉडक्शन अंतर्गत बनलेल्या या सिनेमाचं दिग्दर्शन अभिषेक पाठक यांनी केली आहे.

हेही वाचा: Drishyam 2: साऊथ व्हर्जनपेक्षा पूर्ण वेगळा आहे हिंदी 'दृश्यम 2', अजय देवगणचा बदलांविषयी मोठा खुलासा

सिनेमाची तिकीटं २५ % डिस्कीऊंटने बूक करण्यासाठी प्रेक्षकांनी PVR,INOX किंवा CARNIVAL यांच्या वेबसाईट किंवा ट्वीटर हॅंडलवर जायचे आहे.तिथे दिल्या गेलेल्या डिटेल्सच्या आधारावर तिकीटं बूक करायची आणि ऑफरचा लाभ घ्यायचा. याव्यतिरिक्त बूक माय शो सारख्या साइट्सवर देखील या ऑफरच्या डिटेल्स उपलब्ध आहेत.

दृश्यम २ चा पहिला भाग सुपरहिट राहिला होता. 'दृश्यम २' च्या घोषणेनंतर सिनेमा बराच चर्चेत राहिला होता. सिनेमाचा ट्रेलर काही दिवसांपूर्वीच रिलीज झाला आहे आणि प्रेक्षकांना तो पसंतीसही पडला आहे. आता पहायचं की थिएटरमध्ये सिनेमा रिलीज झाल्यावर कसा प्रतिसाद मिळतोय ते. बोललं जात आहे की सिनेमा ओपनिंग डे रोजी चांगला बिझनेस करेल.