Drishaym 2: अजयच्या 'दृष्यम'ला मोठा झटका! काय आहे कारण? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Drishaym 2

Drishaym 2: अजयच्या 'दृष्यम'ला मोठा झटका! काय आहे कारण?

Ajay Devgn Drishyam 2: बॉलीवूडचा प्रसिद्ध अभिनेता अजय देवगणच्या मागे लागलेलं ग्रहण काही सुटण्याचे नाव घ्यायला तयार नाही. त्याच्या थँक गॉड चित्रपटाचा वाद अजुन शांत झालेला नाही तोच बहुचर्चित अशा दृष्यम 2 चित्रपटानं अक्षयला मोठा हादरा दिला आहे. बाकी कोणत्या नाही पण त्याच्या दृष्यम चित्रपटाला मोठा प्रतिसाद मिळेल असा अनेकांचा अंदाज आहे.

अजयच्या दृष्यमच्या व्हायरल झालेल्या टीझर आणि ट्रेलरला प्रेक्षकांचा वारेमाप प्रतिसाद मिळाला. त्याचे कौतूकही झाले आहे. आता त्यांना चित्रपटाचे वेध लागले आहेत. दृष्यमच्या पहिल्या भागाला प्रेक्षकांनी डोक्यावर घेतले होते. मुळ साऊथचा रिमेक असणाऱ्या या चित्रपटाच्या हिंदी रिमेकला देखील प्रेक्षकांची मिळालेली पसंती ही निर्मात्यांना सुखावणारी बाब होती. त्यामुळेच की काय त्यांनी बऱ्याच वर्षांनी का होईना त्याच्या दुसऱ्या पार्टला प्रदर्शित करण्याचा निर्णय घेतला आहे.

मात्र यासगळ्यात अजयच्या दृष्यमला मोठा दणका बसला आहे. त्याचे झाले असे की, त्याचे जे हिंदी डबिंग आहे ते फारसे प्रभावी झाले नसल्याची बातमी पुढे आली आहे. वास्तविक दृष्यमला येत्या काळात कांतारा, हर हर महादेव सारख्या चित्रपटांना टक्कर द्यावी लागणार आहे असे जरी असले त्याच्या डबिंगवरुन मेकर्स नाराज असल्याचे सांगितले जात आहे. सोशल मीडियावर ही बातमी व्हायरल झाली आहे.

हेही वाचा: Jacqueline Fernandez: 'तिला वाटायचं मी तिच्यावर...' सुकेशचा मोठा खुलासा

असं सांगितलं जात आहे की, मुळ दृश्यम चित्रपट हा येत्या काळात ओटीटीवर प्रदर्शित होणार आहे. अजयच्या दृष्यम प्रदर्शित होण्यापूर्वी हा चित्रपट प्रदर्शित झाला तर तो अजयसाठी मोठा दणका असणार आहे. त्याला बॉक्स ऑफिसवर मोठ्या नुकसानीला सामोरं जावं लागणार आहे. अजयचा दृष्यम हा 22 नोव्हेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे. त्यात तब्बु, इशिता दत्ता, मृणाल जाधव आणि रजित कपूर यांच्या भूमिका आहेत. मोहनलाल यांचा दृष्य़म 2 हा अॅमेझॉन प्राईमवर मल्याळममध्ये असून तो सबटायटल्ससहित पाहिला जाऊ शकतो.

हेही वाचा: Prasika Vedpathak: 'जळू नका, बरोबरी करा!' नवऱ्याचा अपमान करणाऱ्यांना झापलं