बॉलीवूड ड्रग केसमध्ये 'मास्टरमाईंड' आहे एक अभिनेता, मॉडेलिंगमध्ये एकेकाळी सुपरमॉडेल म्हणून होता प्रसिद्ध

deepika sara shraddha
deepika sara shraddha

मुंबई- बॉलीवूड ड्रग केसमध्ये रिया चक्रवर्तीच्या अटकेनंतर इंडस्ट्रीतील अनेक मोठी नावं समोर आली आहेत. दीपिका पदूकोण, सारा अली खान, श्रद्धा कपूर आणि रकुल प्रीत सिंह यांची एनसीबीने चौकशी केली आहे. याशिवाय तीन अभिनेत्यांची चौकशी लवकरंच होणार असल्याचं कळतंय. ड्रग्स नेक्ससमध्ये एक अभिनेता मास्टरमाईंड असल्याचं आता समोर येतंय.

रिपोर्ट्सनुसार, तीन अभिनेता एनसीबीच्या रडारवर आहेत. बॉलीवूड आणि ड्रग्स नेक्ससच्या मागे मास्टरमाईंड एक अभिनेता असल्याची माहिती समोर येतेय. हा अभिनेता सुपरमॉडेल देखील होता. एनसीबी येणा-या काही दिवसांमध्ये तीन अभिनेत्यांना समन्स पाठवू शकते. सध्या तपास यंत्रणा त्यांची ओळख पटवण्यासाठी प्रयत्न करतेय जो इंडस्ट्रीमध्ये अभिनेत्यांना, दिग्दर्शकांना आणि निर्मात्यांना ड्रग्स पोहोचवतो.

बॉलीवूड आणि ड्रग्सच्या साखळीत एक अभिनेता मास्टरमाईंड आहे जो कित्येक ड्रग पेडलर्सशी संबंधित आहे. हा मास्टरमाईंड ड्रग्सचं सेवन करण्यासोबतंच ड्रग्स पोहोचवण्याचं देखील काम करतो. मात्र यावर अजुन एनसीबीने कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही. 

एनसीबीच्या सुत्रांनुसार, दीपिका, सारा अली खान आणि श्रद्धा कपूर यांनी ड्रग प्रकरणात एकसारखे जबाब दिले आहेत. त्यामुळे या तीघीही पूर्ण तयारीनिशी पोहोचल्याचं कळतंय. दीपिका तिची मॅनेजर करिश्मा आणि सारा अली खान यांनी गोव्यातंच वकिलांसोबत ऑनलाईन सल्लामसलत करुन चौकशीची तयारी केल्याचं म्हटलं जातंय. तर इकडे रकुलप्रीत सिंह आणि श्रद्धा कपूर यांनी ऑनलाईन वकिलांसोबत संवाद साधत काय उत्तरं द्यायची याची तयारी केल्याची चर्चा आहे.

तीघींच्या जबाबात फार काही विरोधाभास आढळून आलेला नाही त्यामुळे एनसीबी आत्तापर्यंत कोणत्याही निर्णयापर्यंत पोहोचलेली नाही. यासोबतंच एनसीबीने बुधवारी हे स्पष्ट केलं की त्यांनी अजुन कोणालाही क्लीनचीट दिलेली नाही.   

drug case an actor who also a supermodel in the past mastermind of drug nexus as per reports  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com