esakal | आर्यनला एनसीबी कोठडीत वाचायला दिली विज्ञानाची पुस्तकं
sakal

बोलून बातमी शोधा

Aryan Khan

Drugs Case: आर्यनला एनसीबी कोठडीत वाचायला दिली विज्ञानाची पुस्तकं

sakal_logo
By
स्वाती वेमूल

Cordelia Cruise क्रूझवर पार्टी करण्यासाठी ड्रग्ज घेऊन गेल्याप्रकरणी अभिनेता शाहरुख खानचा Shah Rukh Khan मुलगा आर्यन खानसह Aryan Khan आठही जणांना न्यायालयाने ७ ऑक्टोबरपर्यंत एनसीबी कोठडी सुनावली. एनसीबी कोठडीत आर्यनला विज्ञानाची पुस्तकं वाचायला दिल्याचं कळतंय. त्याने स्वत:च ती पुस्तकं मागितल्याचं वृत्त 'इंडिया टुडे'नं दिलं आहे. इतर आरोपींसोबत त्याला एनसीबी मुख्यालयाजवळील नॅशनल हिंदू रेस्तराँमधून दररोज जेवण दिलं जात आहे. कारण घरून आणलेल्या जेवणाच्या डब्याला एनसीबी ऑफिसमध्ये परवानगी नाही. दरम्यान, आर्यन खान आणि इतर आरोपींचे मोबाईल फॉरेन्सिक तपासणीसाठी गांधी नगर इथल्या प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत.

मंगळवारी एनसीबीने याप्रकरणी आणखी चार जणांना अटक केली. हे चारही जण दिल्लीतील इव्हेंट मॅनेजमेंट फर्म नमस्क्रेचे कर्मचारी आहेत. एनसीबीने आर्यन खान, अरबाज मर्चंट आणि मुनमुन धामेचा यांच्यासह नऊ जणांना अटक केली होती. गुरुवारपर्यंत एनसीबीच्या कोठडीत असलेल्या आर्यनची भेट शाहरुखने एनसीबीच्या परवानगीने लॉकअपमध्ये घेतली. तर आई गौरी ही देखील बर्गरसह आली. मात्र बर्गर देण्यास एनसीबीच्या वरिष्ठांनी नकार दिल्याची सूत्रांची माहिती आहे. आईवडिलांची भेट घेतल्यानंतर आर्यनला अश्रू अनावर झाले.

हेही वाचा: Drugs case: आर्यनचे वकील सतीश मानेशिंदेंची एका दिवसाची फी ऐकून व्हाल थक्क!

आर्यनसोबत आणखी १० जण एनसीबीच्या लॉकअपमध्ये होते. रेव्ह पार्टी प्रकरणी मुनमुन धामेचा, अरबाज मर्चंट, विक्रांत छोकर, नुपूर सारिका, इश्मित सिंग, मोहक जैस्वाल आणि गोमीत चोप्रा यांना एनसीबीच्या पथकाने ताब्यात घेतले आणि न्यायालयात नेल्यानंतर गुरुवारपर्यंतची पोलीस कोठडी मिळवली.

loading image
go to top