esakal | आर्यनचे वकील सतीश मानेशिंदेंची एका दिवसाची फी ऐकून व्हाल थक्क!
sakal

बोलून बातमी शोधा

satish maheshinde

Drugs case: आर्यनचे वकील सतीश मानेशिंदेंची एका दिवसाची फी ऐकून व्हाल थक्क!

sakal_logo
By
स्वाती वेमूल

Drugs case: ड्रग्ज प्रकरणात मुलगा आर्यनची Aryan Khan तुरुंगातून सुटका करण्यासाठी अभिनेता शाहरुख खानने प्रसिद्ध वकील सतीश मानेशिंदे Satish Maneshinde यांची नियुक्ती केली आहे. सतीश मानेशिंदे हे हाय-प्रोफाईल वकील असून ते कोर्टात आर्यनची बाजू मांडणार आहेत. सतीश यांनी याआधी अभिनेत्री रिया चक्रवर्ती, सलमान खान आणि संजय दत्त यांच्या केसेससुद्धा हाताळल्या होत्या. मानेशिंदे यांना भारतातील प्रसिद्ध वकिलांपैकी एक मानलं जातं.

मानेशिंदे यांनी १९९८ मधील काळवीट शिकार प्रकरणात सलमानची आणि १९९३ च्या बॉम्बस्फोट प्रकरणात संजय दत्तची बाजू मांडली होती. त्यांनी सलमानला ड्रंक अँड ड्राइव्ह प्रकरणात जामिनही मिळवून दिला होता. ते देशातील महागड्या वकिलांपैकी एक असून २०१० मधील एका रिपोर्टनुसार ते दिवसाला १० लाख रुपये इतकी फी घेतात. अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर अभिनेत्री रिया चक्रवर्ती अडचणीत आली होती. त्यावेळी कोर्टात रियाचा बचाव मानेशिंदे यांनीच केला होता.

हेही वाचा: ड्रग्ज प्रकरण: आर्यन खानच्या अटकेनंतर जया बच्चन का होतायत ट्रोल?

हेही वाचा: Aryan Arrested: 'ही वेळसुद्धा निघून जाईल'; सेलिब्रिटींचा शाहरुखला पाठिंबा

प्रसिद्ध वकील राम जेठमलानी यांच्या मार्गदर्शनाखाली १९८३ साली सतीश मानेशिंदे यांनी वकिलीची प्रॅक्टिस सुरु केली. त्यांनी दहा वर्षे जेठमलानी यांच्यासोबत काम केलं होतं. मानेशिंदे हे ५५ वर्षांचे असून त्यांना महागड्या गाड्यांची आवड असल्याचं म्हटलं जातं.

loading image
go to top