esakal | ड्रग्ज केस; अभिनेत्री ममता कुलकर्णीला कोर्टाकडून दिलासा नाहीच
sakal

बोलून बातमी शोधा

actress mamta kulkarni

ड्रग्ज केस; अभिनेत्री ममता कुलकर्णीला कोर्टाकडून दिलासा नाहीच

sakal_logo
By
युगंधर ताजणे

मुंबई - कोणेएकेकाळी आपल्या सौंदर्यानं आणि अभिनयानं प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेणारी अभिनेत्री म्हणून ममता कुलकर्णीचं (mamta kulkarni) नाव घ्यावं लागेल. मात्र ममताच्या प्रगतीत अडसर ठरला तो तिचा आक्रमक स्वभाव. त्यामुळे तिला लाईम लाईट पासून दूर व्हावं लागलं. तिनं 90 च्या दशकामध्ये आपल्या अभिनयानं प्रेक्षकांची पसंती मिळवली. त्यावेळी तिनं दिलेल्या बोल्ड सीननं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं होतं. एका फॅशन मॅगझीनसाठी तिनं हॉट फोटो देऊन खळबळ उडवून दिली होती. आजची ममताच्या त्या प्रकरणाची चर्चा रंगलेली दिसते. आता ममता पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. (drugs case thane court rejects mamta kulkarni plea to defreeze bank accounts yst88)

ठाण्याच्या कोर्टानं ममताला पुन्हा एकदा फटकारलं आहे. कोर्टानं ममता कुलकर्णीचे सहा बँक अकाउंट डी फ्रीज करण्याच्या याचिकेला फेटाळलं आहे. त्यामुळे ममताचे सहा बँक अकाउंट, तीन एफ डी आणि दोन मुंबईमधील फ्लॅट्स हे सध्या सील करण्यात आले आहे. याचे महत्वाचे कारण म्हणजे ममताचा दोन कोटींच्या ड्रग्ज केसमध्ये असलेला सहभाग. आपल्या याचिकेमध्ये ममतानं दावा केला होता की, तिच्या विरोधात करण्यात आलेले आरोप हे खोटे आहेत. आणि आपले सील करण्यात आलेले बँक अकाउंट अन्यायकारक असल्याचे तिनं म्हटलं आहे. आपले नाव बळजबरीनं दोषारोपत्रात टाकण्यात आले आहे.

हेही वाचा: यो यो हनी सिंगच्या 'संसाराचा सूर' भरकटला, 'तिचं नेहमीच ऐकत आलोय'

हेही वाचा: ऑलिम्पियन प्रवीण जाधवच्या 'वादात' साताऱ्याच्या नेत्यांची उडी!

पोलिसांकड़े अद्याप कोणतेही ठोस पुरावे नाहीत. 2016 मध्ये मुंबई पोलिसांनी ठाण्याच्या एका पोलीस स्टेशनमध्ये ममता कुलकर्णीच्या विरोधात गुन्हा दाखल केला होता. त्यावर अद्याप सुनावणी सुरु आहे. अभिनेत्रीच्या वकिलांनी कोर्टात सांगितले की, आपल्या अशिलाला फसवण्यात आले आहे. त्यांच्यावर त्यांच्या कुटूंबाची जबाबदारी आहे. त्यांची बहिण ही एका मानसिक आजारानं त्रस्त आहे. अशावेळी त्यांना पैशांची गरज आहे. त्यांचे सगळे बँक अकाउंट फ्रीज करण्यात आले असतील तर त्यांनी काय करावं, असा प्रश्न ममताच्या वकिलांनी कोर्टात विचारला.

loading image
go to top