Pushpa 2: पैशांपेक्षा तत्व मोठी.. या मोठ्या कारणामुळे समंथा 'पुष्पा २' मध्ये दिसणार नाही.. | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

samantha, pushpa 2, allu arjun, samantha ruth prabhu

Pushpa 2: पैशांपेक्षा तत्व मोठी.. या मोठ्या कारणामुळे समंथा 'पुष्पा २' मध्ये दिसणार नाही..

Pushpa 2 Latest News: झुकेगा नही साला म्हणत अल्लू अर्जुनचा पुष्पा २ सिनेमा प्रचंड गाजला. पुष्पा म्हणजे जितकी अल्लू अर्जुनच्या अभिनयाची चर्चा झाली तितकीच जास्त चर्चा समंथाच्या आयटम सॉंगची झाली.

समंथा आणि अल्लू अर्जुनच्या डान्सनी प्रचंड लोकप्रिय झालेलं 'उ अंटवावा' हे गाणं चर्चेत राहीलं. या गाण्यात समंथा आणि अल्लू अर्जुनने केलेला डान्स आणि समंथाच्या मादक अदा अशा अनेक गोष्टींची खूप चर्चा झाली. पण आता समंथा 'पुष्पा २' मध्ये दिसणार नाही.

अल्लू अर्जुनचा पुष्पा २ या वर्षी २०२३ ला प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. सध्या सिनेमाचं शूटिंग अखेरच्या टप्प्यावर आहे. पहिल्या भागाप्रमाणे दुसऱ्या भागातही समंथा दिसणार अशी प्रचंड चर्चा होती. पण समंथाने पुष्पा २ मध्ये काम करण्यास स्पष्ट नकार दिलाय.

अनेकांना वाटलं कि समंथाची सध्याची लोकप्रियता बघता मानधनामुळे काही समस्या निर्माण झाली आहे का? पण असं नाही.. पैशांपेक्षा तत्व मोठी या मतावर ठाम राहत एका वेगळ्याच कारणामुळे समंथाने पुष्पा २ मध्ये काम करण्यास नकार दिलाय.

पुष्पा २ च्या टीमने याविषयी खुलासा केलाय कि, समंथा तिच्या कारकिर्दीच्या अशा टप्प्यावर आहे कि या टप्प्यावर ती आयटम नंबर करण्यास तयार नाही. निर्माते तिचे मन वळवण्याचा आटोकाट प्रयत्न करत आहेत. आणि त्याचवेळी या खास गाण्यासाठी भारतीय सिनेसृष्टीतील काही बड्या अभिनेत्रींच्या नावांचा शोध घेत आहेत.

दिग्दर्शक म्हणून पहिल्या सिनेमापासूनच, सुकुमारला त्याच्या सर्व सिनेमांमध्ये आयटम नंबर असतो म्हणून ओळखले जाते. पुष्पा आणि पुष्पा 2 सुद्धा याला अपवाद नाही. चर्चा अशीही आहे कि, सुकुमारने समंथासाठी एक लहान भूमिका तयार केली आहे. हि छोटीशी भूमिका पुष्पा २च्या स्टोरीशी जोडली असेल.

पण असे दिसते की समंथाला कितीही कितीही पैसे दिले कि तरीदेखील आयटम नंबर करण्याच्या मूडमध्ये नाही. निर्मात्यांच्या बोलण्याने भविष्यात समंथा तिचा विचार बदलेल अशी आशा करूया. १७ डिसेंबर २०२३ ला पुष्पा २ जगभरात प्रदर्शित होणार आहे

टॅग्स :samanthaAllu Arjun