esakal | BIG NEWS : सुशांत सिंग राजपूत प्रकरणः रिया चक्रवर्तीला ईडीने पाठवला समन्स..
sakal

बोलून बातमी शोधा

BIG NEWS : सुशांत सिंग राजपूत प्रकरणः रिया चक्रवर्तीला ईडीने पाठवला समन्स..

बॉलीवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूरतच्या आत्महत्येप्रकरणी सक्तवसुली संचलनालयाने (ED) गुन्हा दाखल केल्यानंतर आता रिया चक्रवर्तीला चौकशीसाठी उपस्थित राहण्यासाठी समन्स पाठवले आहे.

BIG NEWS : सुशांत सिंग राजपूत प्रकरणः रिया चक्रवर्तीला ईडीने पाठवला समन्स..

sakal_logo
By
अनिश पाटील

मुंबई : बॉलीवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूरतच्या आत्महत्येप्रकरणी सक्तवसुली संचलनालयाने (ED) गुन्हा दाखल केल्यानंतर आता रिया चक्रवर्तीला चौकशीसाठी उपस्थित राहण्यासाठी समन्स पाठवले आहे. यापूर्वी याप्रकरणी रियाच्या सीएची याप्रकरणी ईडीने चौकशी केली होती.

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतने आत्महत्या करुन जवळपास दीड महिना उलटला आहे. पण त्याच्या आत्महत्येचे नेमकं कारण अद्याप समोर आलेलं नाही. अनेक कलाकारांनी याप्रकरणी सीबीआय चौकशी करण्याची मागणी देखील केली आहे. दरम्यान, बुधवारी या घटनेला वेगळ वळण मिळालं. सुशांतचे वडील के. के. सिंह यांनी सुशांत सिंह गर्लफ्रेंड व अभिनेत्री रिया चक्रवर्तीविरोधात तक्रार दाखल केली.

हेही वाचा : ​शेवटी डॉक्टरांनी निर्णय घेतला, रुग्णाच्या मेंदूच्या कवटीच्या हाडाचा तुकडा काढला आणि...

या तक्रारीमध्ये त्यांनी रियाने घर सोडताना घरातील रोख रक्कम, दागिने, लॅपटॉप, क्रेडिट कार्ड आणि सुशांतच्या वैद्यकीय सूचनांची कागदपत्रे सोबत नेली असे म्हटले आहे. तसेच सुशांतच्या खात्यामधील 15 कोटी रुपये देखील रियाने काढले असल्याचे म्हटले होते. याप्रकरणी आत्महत्येक प्रवृत्त केल्याचा गुन्हा बिहार पोलिसांनी दाखल केल्यानंतर याप्रकरणी मुंबईत तपासाला सुरूवात केली. त्यानंतर आता ईडीनेही याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता.

आता याप्रकरणी ईडीने रियाला समन्स पाठवले आहे. सात ऑगस्टला चौकशीसाठी उपस्थित राहण्यासाठी हे समन्स पाठवण्यात आले आहे, असे सूत्रांनी सांगितले. याप्रकरणी सोमवारी रियाचे चार्टर्ड अकाऊंटंट संदीप श्रीधर यांची ईडीने चौकशी केली होती. 

( संकलन - सुमित बागुल )

ED summons Rhea Chakraborty for questioning on Friday in Sushant Singh Rajput case