esakal | शेवटी डॉक्टरांनी निर्णय घेतला, रुग्णाच्या मेंदूच्या कवटीच्या हाडाचा तुकडा काढला आणि...
sakal

बोलून बातमी शोधा

शेवटी डॉक्टरांनी निर्णय घेतला, रुग्णाच्या मेंदूच्या कवटीच्या हाडाचा तुकडा काढला आणि...

सर.एच.एन रिलायन्स फाऊंडेशन हॉस्पिटलच्या डॉक्टरांचे यशस्वी उपचार 

शेवटी डॉक्टरांनी निर्णय घेतला, रुग्णाच्या मेंदूच्या कवटीच्या हाडाचा तुकडा काढला आणि...

sakal_logo
By
भाग्यश्री भुवड

मुंबई : वरळीतील 30 वर्षीय रुग्णाला अचानक स्ट्रोक आणि अवयव निकामी होण्याचा त्रास झाला. 30 जुन रोजी साहस कोळी यांना बेशुद्धावस्थेत फाऊंडेशन हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. अनेक अवयवांचे काम बंद होत असल्याने म्हणजेच मल्टि-ऑर्गन फेल्युअरमुळे त्यांच्या वाचण्याची शक्यता फारच कमी होती. मात्र, तब्बल एक महिन्याच्या यशस्वी उपचारानंतर 31 जुलैला त्यांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आला आहे. 

साहस याना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्याच्या 10 तास आधी त्यांच्या शरीराच्या डाव्या बाजूला अर्धांगवायू, शुद्ध नसणे आणि सतत उलट्या होणे अशी स्ट्रोकची लक्षणे दिसू लागली होती. रुग्णालयात तात्काळ मेंदूचा सीटी स्कॅन करण्यात आला. त्यांच्या मेंदूच्या उजव्या बाजूला स्ट्रोक आला होता आणि त्यातून मेंदूचे 70 टक्के नुकसान झाले होते. शिवाय, त्यांच्या मूत्राशय आणि यकृतालाही इजा झाली होती.

BIG NEWS : कोरोनावरील दोन मोठ्या कंपन्यांच्या गोळ्या बाजारात, किंमत केवळ ३५ रुपये

साधारणतः अशा परिस्थितीत स्ट्रोकच्या रुग्णामध्ये इतक्या जीवघेण्या रक्तदाबाच्या तक्रारी नसतात आणि इतकी गंभीर लक्षणेही अशा रुग्णांमध्ये दिसत नाहीत. त्यामुळे, या रुग्णाल कोविड-19 ची लागण असल्याचा संशय आला. रुग्णाची पहिली कोविड-19 चाचणी नकारात्मक असली तरीही डॉक्टरांना हा संशय होता. रुग्ण कोमात जाण्याची सुरुवात होत होती. त्यामुळे, डॉक्टरांनी डीकंप्रेसिव्ह क्रॅनिओटोमी ही न्यूरोसर्जरी  करण्याचा निर्णय घेतला. यात कवटीच्या हाडाचा तुकडा काढला जातो. त्यामुळे मेंदूची सूज मेंदूतील कोणत्याही महत्त्वाच्या केंद्रांना न दाबता वाढते. सुरुवातीच्या टप्प्यात 11 डॉक्टरांची टीम दर 8 ते 12 तासांनी रुग्णाची सखोल तपासणी करत होते. शस्त्रक्रियेनंतर पाचव्या दिवशी सर्व प्रकारची जीवरक्षक प्रणाली, होमो-अॅडसॉर्प्शन फिल्टर आणि डायलिसिस बंद करण्यात आले.

BIG NEWS राम मंदिराचं मोठं श्रेय लालकृष्ण अडवाणी आणि बाळासाहेब ठाकरे यांना, लतादीदींनी केलं ट्विट...

पुढील दोन आठवड्यात त्यांच्यामध्ये बरीच सुधारणा झाली होती. हळूहळू व्हेंटिलेटरचा वापर कमी करण्यात आला. रक्ताच्या चाचण्या आणि हृदयाचे ठोके पूर्ववत झाले आणि त्यानंतर त्यांची कोविड चाचणीही निगेटिव्ह आली. चार आठवडे सर एच एन आर एफ एच च्या ICU मध्ये काढल्यानंतर कोळी यांना 31 जुलै रोजी डिस्चार्ज देण्यात आला. 

साहस कोळी यांना न्युरो-रीहॅबिलिटेशनची आवश्यकता भासणार आहे. डीकंप्रेसिव्ह क्रॅनिओटोमीमध्ये कवटीच्या भागाचा तुकडा काढण्यात आला होता. तो पुन्हा लावण्यासाठी तीन ते सहा महिन्यानंतर त्यांच्यावर पुन्हा एकदा शस्त्रक्रिया करण्यात येईल. असं डॉ. बिपीनचंद्र भामरे यांनी म्हटलंय. 

( संपादन - सुमित बागुल )

decompressive craniotomy neurosurgery performed patient is now out of danger

loading image