esakal | इजिप्त सिने जगताचा आधारस्तंभ हरपला, अभिनेते महमूद यासिन यांच निधन
sakal

बोलून बातमी शोधा

mahmood yassine

इजिप्तचे प्रसिद्ध अभिनेते महमूद यासिन यांचं निधन झालं आहे. ते ७९ वर्षांचे होते.

इजिप्त सिने जगताचा आधारस्तंभ हरपला, अभिनेते महमूद यासिन यांच निधन

sakal_logo
By
दिपाली राणे-म्हात्रे, टीम ई सकाळ

मुंबई- इजिप्तचे प्रसिद्ध अभिनेते महमूद यासिन यांचं निधन झालं आहे. ते ७९ वर्षांचे होते. सोशल मिडियावर चाहते त्यांच्या आवडत्या अभिनेत्याला श्रद्धांजली अर्पण करत आहेत. ते २० व्या शतकातील इजिप्त सिने जगतातले आधारस्तंभ मानले जायचे. यासिन यांना वयामुळे होत असलेल्या समस्यांचा सामना करत होते.

हे ही वाचा: व्हिडिओ: संजय दत्तचा नवा लूक, म्हणाला 'मीकॅन्सरला हरवेन'  

अभिनेते महमूद यासिन यांच्या निधनाची बातमी त्यांचा मुलगा अम्र महमूद यासिन यांनी सोशल मिडियाच्या माध्यमातून दिली. त्यांनी लिहिलं, ते केवळ एक उत्तम व्यक्ती नव्हते तर एक उत्तम वडिल देखील होते. त्यांच्या गुरुवारी अंतिम संस्कार केले जातील. त्यांच्या पश्चात पत्नी शाहिरा, मुलगी रानिया आणि मुलगा अम्र हे आहेत. त्यांची पत्नी आणि मुलगी देखील अभिनय क्षेत्रात आहेत.

यासिन यांनी त्यांच्या करिअर दरम्यान जवळपास १५० सिनेमांमध्ये काम केलं होतं. त्यांनी कायद्याचा अभ्यास केल्यानंतर अभिनयाकडे वळले. २०१२ मध्ये कॉमेडी सिनेमा 'ग्रँडपा हबीबी'मध्ये ते शेवटचे दिसून आले होते.    

egyptian actor mahmoud yassine dies at the age of 79