'इक लडकी को देखा तो एैसा लगा' चा टीझर लाँन्च

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 29 जून 2018

वीरे दी वेडींग सिनेमानंतर सोनम कपूर आता वडील अनिल कपूर सोबत या सिनेमात स्क्रिन शेअर करणार आहे.

'इक लडकी को देखा तो एैसा लगा' हे सुपरहीट गाणं आठवतयं का? हे गाणं '1942 अ लव्ह स्टोरी' सिनेमातील आहे. 1994 साली प्रदर्शित झालेल्या या सिनेमातील हे गाणं आजही लोकप्रिय आहे. या गाण्याचे बोल घेऊन लवकरच एक सिनेमा आपल्या भेटीला येणार आहे.

'इक लडकी को देखा तो एैसा लगा' या सिनेमाचा टीझर नुकताच प्रदर्शित झाला आहे. वीरे दी वेडींग सिनेमानंतर सोनम कपूर आता वडील अनिल कपूर सोबत या सिनेमात स्क्रिन शेअर करणार आहे. सिनेमाचे पोस्टर सोनम कपूरने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर पोस्ट केले आहे. सिनेमात जुही चावला आणि राजकुमार राव यांच्याही मुख्य भुमिका आहेत. 

 

या टीझरमध्ये अनिल कपूरच्या 'इक लडकी को देखा तो एैसा लगा' या गाण्याची झलकही दाखवली आहे. सिनेमाचे दिग्दर्शन राजकुमार हिरानी यांचे असून विधु विनोद चोपडा हे निर्माते आहेत.  
 

 

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

Web Title: Ek Ladki Ko Dekha Toh Aisa Laga teaser out