
Ek Villain Returns Fees: स्टारकास्टच्या मानधनाचा आकडा भलताच मोठा!
Ek Villain Returns Starcast Fees: दिशा पटानीनं तर एक व्हिलन रिटर्न्ससाठी जोरदार प्रमोशनला सुरुवात केली आहे. काही दिवसांपूर्वी तिनं बोल्ड फोटो शुट करत एक व्हिलन येतोय असं सांगत चाहत्यांना सुखद धक्का दिला आहे. दुसरीकडे दिशाची मोठी बातमी समोर आली आहे. ती म्हणजे दिशा आणि टायगर (disha patani and tiger shroff break up) श्रॉफचं ब्रेक अप. या प्रसिद्ध सेलिब्रेटींचा ब्रेक अप झाल्यानंतर त्यांच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. मोहित सुरी यांनी दिग्दर्शित केलेल्या एक व्हिलनच्या पहिल्या भागाला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाला होता.
एक व्हिलन रिटर्न्सच्या पहिल्या भागात रितेश देशमुखनं प्रभावी भूमिका (ritesh deshmukh) साकारली होती. आता प्रेक्षकांना दुसऱ्या भागाचे वेध लागले आहेत. त्यात काम केलेल्या कलाकारांनी घेतलेल्या मानधनाचा आकडा सोशल मीडियावर नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेत आहे. उद्या हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येतो आहे. जॉन अब्राहमच्या अॅटकला फारसा प्रतिसाद काही मिळाला नाही. त्यामुळे त्याच्या या चित्रपटाकडून चाहत्यांना मोठ्या अपेक्षा आहेत. जॉन, सिद्धार्थ मल्होत्रा यांच्याशिवाय तारा सुतारिया देखील या चित्रपटातून प्रेक्षकांसमोर येणार आहे.
मीडियातील सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जॉनला या चित्रपटासाठी सहा कोटी रुपयांचे मानधन मिळाले आहे. दिशा पटानीनं एक व्हिलनच्या निमित्तानं मोठ्या प्रमाणावर प्रसिद्ध इन कॅश करण्याचा प्रयत्न केला आहे. तिला मिळालेल्या मानधनाचा आकडा हा चार कोटींच्या घरातला आहे. यावरुन दिशाच्या स्टारडमची प्राईज व्हॅल्युएशन आपल्या लक्षात येईल. तिन या चित्रपटामध्ये नीना शेट्टीची भूमिका केली आहे.
हेही वाचा: Malaika Arora: बघतच राहाल ! मलाईकाचं जिम लूकही तेवढंच हॉट
अर्जुन कपूर हा त्याच्या प्रोफेशनल लाईफपेक्षा पर्सनल लाईफसाठी अधिक चर्चेत असतो. मलायका आणि त्याच्या लग्नाची तयारी आता सुरु झाली आहे. एक व्हिलन रिटर्न्समध्ये अर्जुन कपूर हा उदय खुराणाच्या भूमिकेत आहे. अर्जुनला त्याच्या भूमिकेसाठी चार कोटी रुपये मिळाले आहेत. तारा सुतारियाला अजुनही एका हिट मुव्हीची गरज आहे. एक व्हिलन रिटर्न्सच्या माध्यमातून तिला ही अपेक्षा आहे.
हेही वाचा: Ranveer Singh: 'टेन्शन नही लेनेका और...' टाटा सन्सच्या एन. चंद्रशेखर यांचा भन्नाट सल्ला
Web Title: Ek Villain Returns Starcast Fees Disha Patani John Abraham Tara Sutaria Bollywood Movie
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..