'बिग बॉस'च्या घरात होणार एकता कपूरची एंट्री

दिपाली राणे-म्हात्रे
Friday, 20 November 2020

टीव्ही क्वीन म्हणून ओळख असलेली एकता कपूर 'बिग बॉस'च्या घरामध्ये दिसणार आहे. यामागचं कारणंही वेगळं आहे. 

मुंबई- 'बिग बॉस' हा रिऍलिटी शो नेहमीच वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत असतो. अनेक प्रोजेक्टसाठी 'बिग बॉस' हा प्रमोशनचा आवडता प्लॅटफॉर्म मानला जातो. टीव्ही पासून ते बॉलीवूडपर्यंतचे अनेक सेलिब्रिटी या शोमध्ये हजेरी लावतात. आता तर टीव्ही क्वीन म्हणून ओळख असलेली एकता कपूर 'बिग बॉस'च्या घरामध्ये दिसणार आहे. यामागचं कारणंही वेगळं आहे. 

हे ही वाचा: अभिनेता निखिल द्विवेदीला झाली कोरोनाची लागण    

निर्माती एकता कपूर 'बिग बॉस'च्या घरात एक स्पर्धक म्हणून नाही तर आपल्या आगामी ‘बिच्छु का खेल’ या वेब सीरिजच्या प्रमोशनसाठी 'बिग बॉस'मध्ये जाणार आहे. एकता कपूरसोबत मिर्झापूरचा मुन्ना भैय्याही 'बिग बॉस'च्या सेटवर दिसणार आहे. पिंकविलानं यासंदर्भातील माहिती दिली आहे. पहिल्यांदाच बिग बॉसच्या घरात एकता कपूर आणि दिव्येंदू वेगळ्याच स्टाईलमध्ये दिसणार आहेत. यापूर्वीही एकता कपूर 'बिग बॉस'मध्ये आली होती. परंतु आता ती 'बिग बॉस'च्या घरात एंट्री करणार आहे. दरम्यान 'बिग बॉस'चे स्पर्धकही यासाठी उत्सुक आहेत. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Colors TV (@colorstv)

एकता आता घरात आल्यानंतर फराह खानप्रमाणेच स्पर्धकांना काही टास्क देणार का? हे येत्या काही दिवसांमध्ये समजेल. १८ नोव्हेंबर रोजी अल्ट बालाजी या ओटीटी प्लॅटफॉर्मवर  एकताची ही नवीन वेबसीरिज रिलीज करण्यात आली आहे. मात्र आता या सीरिजच्या प्रमोशनसाठी एकता कपूर सलमानच्या या खास शोमध्ये दिसणार आहे. या वेब सीरिजमध्ये दिव्येंदूव्यतिरिक्त अंशुल चौहान, झिशान काद्री, राजेश शर्मा, सत्यजित शर्मा, गगन आनंद आणि अभिनव आनंद दिसणार आहेत.

ekta kapoor to enter bigg boss 14 for the first time with host salman khan  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ekta kapoor to enter bigg boss 14 for the first time with host salman khan