
करण जोहर, तुषार कपूर, एक्ता कपूर यांनी सरोगसीद्वारे पालकत्व स्विकारलं आहे. एक्ता कपूरने पहिल्यांदाच तिच्या मुलाला मीडियासमोर आणलं आहे. पाहा तिच्या मुलाचे गोंडस फोटो.
मुंबई : बॉलिवूडमध्ये आणि एकंदरीत सेलिब्रिटींची चर्चा कोणत्या ना कोणत्या कारणाने होतच असते. मनोरंजन क्षेत्रातील या मंडळींना पॅपराझी कॅमेरात कैद करतात. तर, तेवढचं किंबहूना त्यापेक्षा जास्त फुटेज सेलिब्रिटींच्या मुलांनाही मिळते. स्टार किड्सविषयी लोकांना जाणून घेण्याची इच्छा असते. गेल्या काही वर्षांपासून बॉलिवूडमध्ये 'सिंगल पेरेंट'ची एक वेगळी बाजू समोर आली. करण जोहर, तुषार कपूर, एक्ता कपूर यांनी सरोगसीद्वारे पालकत्व स्विकारलं आहे. एक्ता कपूरने पहिल्यांदाच तिच्या मुलाला मीडियासमोर आणलं आहे. पाहा तिच्या मुलाचे गोंडस फोटो.
एक्ता कपूर हे टीव्हीमधील एक प्रख्यात नाव आहे. अनेक मालिकांचं दिग्दर्शन तिने केलं आहे. अभिनेते जितेंद्र कपूर यांची ती मुलगी आहे आणि तुषार कपूर तिचा भाऊ. तुषारने सरोगसीद्वारे पालकत्व स्विकारलं आणि 'यश' नावाचा त्याला मुलगा आहे. आपल्या भावाप्रमाणे एक्ताला एक मुलगा आहे. याआधी कधीच तिने आपल्या मुलाचे फोटो शेअर केले नाहीत. आता मात्र ती पहिल्यांदाच मुलासोबत मीडियासमोर आली आहे.
एक्ताचा मुलगा रवी हा एक वर्षाचा झाला असून त्याचा वाढदिवस नुकताच साजरा झाला. त्याचा वाढदिवस साजरा करतानाचे फोटो आणि व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. शिवाय एक्ताने रवीसोबत पॅपारझींना पोस देत फोटोही काढले.
रवीच्या बर्थडे पार्टीला अनेक सेलिब्रिटी आणि त्यांची मुलं पोहोचली होती.
तुषारनेही त्याच्या मुलासोबत पोस देत फोटो काढले. या पार्टीला इशा देओल आणि तिची मुलगी, रितेश-जेनेलिया आणि त्यांची मुलं आणि सुरवीन चावला तिच्या मुलीसह पोहोचली होती. याशिवाय एक्ताची मित्र-मंडळी आणि सेलिब्रिटी या पार्टीला हजर होते.