जेव्हा स्मृती इराणींनी केला होता रॅम्प वॉक, 'मिस इंडिया' स्पर्धेचा व्हिडिओ व्हायरल

टीम ई सकाळ
शनिवार, 27 जून 2020

एकताने स्मृती इराणींचा एक जबरदस्त व्हिडिओ पोस्ट केला आहे. हा व्हिडिओ पाहून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे.

मुंबई- एकता कपूर आणि केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्या मैत्रीविषयी सगळ्यांनाच माहिती आहे. दोघींची मैत्री क्योंकी सांस भी कभी बहु थी पासूनंची आहे. दोघीही आपापल्या क्षेत्रात पुढे जात आहेत. एकता कपूर सोशल मिडियावर जुन्या आठवणींना उजाळा देत असते. असंच पुन्हा एकदा एकताने एक खास व्हिडिओ शेअर केला आहे जो खूप चर्चेत आहे. एकताने स्मृती इराणींचा एक जबरदस्त व्हिडिओ पोस्ट केला आहे. हा व्हिडिओ पाहून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे.

हे ही वाचा: अपारशक्ती खुरानाने दाखवली झलक, कोरोनानंतर असे शूट होतील रोमँटीक सीन...

एकता कपूरने पोस्ट केलेला हा व्हिडिओ १९९८ सालचा आहे. हा व्हिडिओ पोस्ट करताना एकताने लिहिलंय, 'माझी मैत्रीण स्मृती इराणीने तिच्या करिअरमध्ये १९९८ साली मिस इंडिया स्पर्धेत भाग घेतला होता. ती ही स्पर्धा जिंकली नाही मात्र तिने घराघरात स्वतःची ओळख निर्माण केली. हे त्यांच्यासाठी आहे ज्यांना वाटतं की यश सहजासहजी मिळतं. हे खूप मेहनतीने मिळतं. हे मिळवणं कठीण आहे. हे तेच मिळवू शकतात जे खूप मेहनत करतात. आज ती मंत्री आहे. तिची पूर्ण ओळखंच बदलली आहे.'

एकताने पुढे लिहिलंय, 'जेव्हा स्मृतीने तिच्या करिअरची सुरुवात केली होती ती एकदम साधी आणि लाजाळू मुलगी होती. तिच्या चेह-यावरचं हसू पाहून आम्हाला समजलं होतं की ही सगळ्यांचं मन जिंकेल. स्मृती आजही जमीनीवर आहे आणि नाती कशी जपायची हे तिला माहिती आहे.'

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

Appreciation Post for my friend Smriti Irani who started off not winning Miss India but went on to become a household 

A post shared by Erkrek (@ektarkapoor) on

या व्हिडिओमध्ये स्मृती इराणी रॅम्पवॉक करताना दिसत आहेत. तसंच त्या त्यांच्या आवडीनिवडी विषयी सांगत आहेत. या स्पर्धेत त्यांनी भाग घेतला तेव्हा त्या केवळ २१ वर्षांच्या होत्या. त्यांची खास मैत्रीण एकताने शेअर केलेला हा जुना व्हिडिओ सोशल मिडियावर चांगलाच गाजतोय.   

ekta kapoor shared a video of smriti irani from when she was a contestant in miss india  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ekta kapoor shared a video of smriti irani from when she was a contestant in miss india